सोलापूरची गोल्डन नगरसेविका विधानसभेच्या मैदानात
निवडणूकीची तारीख जशी जवळ येईल तशी शहर मध्य मतदार संघातून इच्छूक उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सोलापूर शहर - जिल्ह्यासह राज्याचे लक्ष विशेषत : मध्य मतदार संघाकडे लागून राहिले आहे.
चर्मकार समाजाच्या माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे हे आता निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. शहर मध्य मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे फुलारे यांनी माध्यमांना सांगितले.
मंगळवार दिनांक २९/१०/२०२४ रोजी दुपारी १२ वाजता त्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. एकेकाळी काँग्रेस मध्ये सक्रिय असलेल्या आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या निष्ठावंत समर्थक म्हणून श्रीदेवी जॉन फुलारे यांच्याकडे पाहिलं जात होत .मात्र पक्षातील अंतर्गत वादामुळे फुलारे यांनी पक्षाला राजीनामा देत पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि आता ते अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने चर्चेला उधाण आलंय.सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीवेळी ही श्रीदेवी जॉन फुलारे यांनी निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आणि नंतर दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि पुनश्च : आता विधासभेच्या निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे फुलारे यांनी जाहीर केलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.