महायुतीत फिस्कटलं! 'आम्ही संपू, तुम्हालाही संपवू' म्हणत भाजपविरोधात शिंदेंच्या शिवसेनेनं पाच उमेदवार केले जाहीर
सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघावरून शिंदेंच्या शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला सोडला नाही, तर भाजपचे उमेदवार पाडू, असा इशारा सोलापूरचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांनी दिला आहे.
त्यामुळे महायुतीत कुठलाही समन्वय नसल्याचं उघड झालं आहे. आमच्या अस्तित्त्वाची ही लढाई आहे. आम्ही सगळ्या जागा भाजपच्या विरोधात लढणार आहोत. आम्ही संपू आणि तुम्हालाही संपवू, अशी 'वॉर्निग'च अमोल शिंदे यांनी भाजपला दिली आहे. यासह शिंदेंनी स्वत:सह पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
अमोल शिंदे म्हणाले, "सोलापूर मध्य मतदारसंघ शिवसेनेकडून आम्ही लढलो होतो. आताही आम्हाला तिथून उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, भाजपकडून आम्हाला गृहीत धरण्यात येत आहे. सोलापूर मध्य मतदारसंघ शिवसेनेला मिळाला नाही, तर सोलापुरातील पाच विधानसभा मतदारसंघात भाजपच्या विरोधात लढू. पाचही जागा जिंकता आल्या नाहीतर, तिथे भाजपचे उमेदवार आम्ही पाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही."
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.