जरांगे-पाटलांनी सांगितल्यास बार्शी विधानसभा लढण्यास तयार : राजा माने जरांगे-पाटील यांच्याशी आंतरवालीत राजा मानेंची चर्चा
आंतरवाली सराटी : बार्शी विधानसभा मतदारसंघातून ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांचे नाव जरांगे-पाटील गोटातून पुढे आल्याची चर्चा सुरु असताना काल मध्यरात्री आंतरवाली सराटी येथील सरपंचाच्या मळा परिसरात राजा माने यांनी मराठा समाजसेवक मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेतली. राजकारण हे आपले कार्यक्षेत्र नाही. तथापि मराठा संपादक म्हणून मनोज जरांगे-पाटील यांनी सांगितल्यास बार्शी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक मैदानात उतरण्याची तयारी राजा माने यांनी दर्शविली.
आजवरची त्यांची निःपक्ष व परखड पत्रकारिता आणि बार्शी तालुक्यासंदर्भातील त्यांची भूमिका त्यांनी जरांगे-पाटील यांच्यापुढे मांडली. यावेळी त्यांच्या समवेत उपस्थित असलेले डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे राज्य सचिव व डिजिटल पुणे न्यूजचे संपादक महेश कुगावकर, संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य व "द इंडिपेंडंट व्हॉइस"चे संपादक अमोल पाटील यांनी डिजिटल मिडियाच्या राज्यभरातील यंत्रणेची माहिती जरांगे-पाटील यांना दिली. राजा माने यांनी मांडलेल्या भूमिकेसंदर्भात येत्या दोन दिवसांत निर्णय घेवू, असे जरांगे-पाटील यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.