नवी मुंबईत भीषण अपघात, शरीराचे दोन तुकडे, कमरेपासून खालचा भाग झाला वेगळा
नवी मुंबईत पाम बीच मार्गावर भीषण अपघात झाला असून यात एकाचा मृत्यू झाला आहे. अपघात इतका भीषण होता की अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या शरीराचे दोन तुकडे झाले आहेत.
दरम्यान, हा अपघात कसा झाला हे समजू शकलेलं नाही. अपघातात कोणत्या वाहनाने धडक दिली आणि चिरडलं हे समोर आलेलं नाही. पोलिसात या अपघाताची नोंद झाली असून अधिक तपास केला जात आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, नवी मुंबईत पाम बीच मार्गावर पहाटे चार वाजता भीषण अपघात झाला. या अपघातातील मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या शरीराचे दोन तुकडे झाले आहेत. कमरेपासून खालचा भाग शरीरापासून वेगळा झालाय. रस्त्यात रक्तामांसाचा चिखल झाला होता. घटनास्थळावरचे दृश्य हादरवून टाकणारे होते. अपघातातील मृत व्यक्तिची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.