Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दीर्घकालीन सहमतीचे अनैतिक संबंध बलात्कार ठरत नाही - उच्च न्यायालय

दीर्घकालीन सहमतीचे अनैतिक संबंध बलात्कार ठरत नाही - उच्च न्यायालय


दीर्घकाळापासून परस्पर सहमतीने आणि कोणत्याही फसवणुकीशिवाय सुरू असलेले अनैतिक संबंध बलात्कार ठरत नाहीत, असा निकाल अलाहबाद उच्च न्यायालयाने दिले आहेत. भारतीय दंड संहितेतील कलम ३७५ नुसार हा निकाल देण्यात आलेले आहे.

लग्नाचे वचन देऊन संबंध कधी सिद्ध होते?

"प्रत्येक लग्नाचे वचन हे परस्पर सहमतीने शरीरसंबंध प्रस्थापित करण्यासाठीचे भ्रामक वचन ठरत नाही. अशा नातेसंबंधाच्या सुरुवातीपासूनच आरोपीने जर फसवे आश्वासन दिले असेल तर ते खोटे वचन म्हणता येते. नातेसंबंधाच्या सुरुवातीपासूनच फसवणुकीचा काही घटक असेल तर लग्नाचे खोटे आमिष म्हटले जाऊ शकते, अन्यथा ते लग्नाचे खोटे वचन म्हणता येणार नाही," असे न्यायमूर्ती अनिष कुमार गुप्ता यांनी म्हटले आहे. ही बातमी बार अँड बँचने म्हटले आहे.

या प्रकरणात श्रेय गुप्ता नावाच्या व्यक्तीवर लग्नाचे वचन देऊन बलात्कार केल्याचा गुन्हा नोंद आहे. न्यायमूर्तींनी हा फौजदारी खटला रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत. फिर्यादी महिला ही विधवा आहे. श्रेय याने लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध ठेवल्याची तक्रार तिने दाखल केली होती. या महिलेने श्रेय याच्यावर खंडणी मागितल्याचीही तक्रार पोलिसांत दिलेली आहे. याविरोधात श्रेय याने न्यायालयात याचिका दाखल केली होती. 

कलम ३७५कधी लागू होते?

न्यायालयाने दोघांतील संबंध १२ वर्षांपासून सुरू असल्याचे अधोरेखित केले. संबंधित महिलेचे वय जास्त आहे, तसेच आरोपी श्रेय हा तिच्या मृत पतीच्या कंपनीत कामाला होता, त्यामुळे महिलने श्रेय याच्यावर दबाव टाकला असावा, असे दिसून येते असे न्यायमूर्तींनी म्हटले आहे.

कलम ३७५ लागू होण्यासाठी महिलेची सहमती ही दबावाने, धमकावून किंवा गैरसमज निर्माण करून घेतलेली असावी लागते, असे न्यायमूर्तींनी म्हटले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.