५००० रुपयाची लाच घेतांना विद्युत कंपनीचा सहाय्यक अभियंता एसीबीच्या जाळ्यात
नाशिक : ट्रांसफॉर्मर बसविण्याच्या कामाचे अंदाजपत्रक तयार करून देणे करिता अहिल्यानगर येथील सुपा येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता राकेश महाजन यांना ५००० रुपयाची लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार हे शासकीय विद्युत ठेकेदार असून त्यांच्या फर्मला वाळवणे, ता.पारनेर, जि.अहिल्यानगर येथील खाजगी रिसॉर्टचे ठिकाणी ट्रांसफॉर्मर बसविण्याचे काम मिळाले आहे. सदर कामाचे अंदाजपत्रक तयार करून देणे करिता आरोपी लोकसेवक महाजन यांनी तक्रारदार यांच्याकडे लाच मागणी केल्याबाबतची तक्रार १४ ऑक्टोंबर रोजी ला.प्र.वि. अहिल्यानगर येथे प्राप्त झाली होती. सदर लाच मागणी तक्रारीच्या अनुषंगाने १५ ऑक्टोंबर रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली. लाच मागणी पडताळणी दरम्यान आरोपी लोकसेवक राकेश पुंडलिक महाजन, सहाय्यक अभियंता यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचा समक्ष पाच हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले. १५ ऑक्टोंबर रोजी आयोजित सापळा कारवाई दरम्यान आरोपी लोकसेवक महाजन यांनी तक्रारदार यांचे कडून पाच हजार रुपयाची लाच स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांचे विरुद्ध सुपा पोलीस ठाणे, जिल्हा अहिल्यानगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यशस्वी सापळा कारवाई
युनिट -अहिल्यानगर.
तक्रारदार- पुरुष,वय- 48 वर्षे
*आलोसे - राकेश पुंडलिक महाजन, वय - 42 वर्ष, पद - सहाय्यक अभियंता, वर्ग -2, म.रा.वि.वि.कं.म. सहाय्यक अभियंता कार्यालय, सुपा, ता.पारनेर, जि.अहिल्यानगर मुळ रा. मु.पो. ताहराबाद, ता. सटाणा, जिल्हा नाशिक सध्या रा.दिपक सोनवणे यांच्या घरी भाडोत्री, नामपुर रोड, डिबी नगर, सटाणा, ता. सटाणा, जिल्हा नाशिक
*लाचेची मागणी - 5,000/- रुपये, दिनांक -15/10/2024
*लाच स्विकारली - 5,000/ रुपये दिनांक -15/10/2024
*हस्तगत रक्कम - 5,000/-रुपये
लाचेचे कारण- तक्रारदार हे शासकीय विद्युत ठेकेदार असून त्यांच्या फर्मला वाळवणे, ता.पारनेर, जि.अहिल्यानगर येथील खाजगी रिसॉर्टचे ठिकाणी ट्रांसफॉर्मर बसविण्याचे काम मिळाले आहे. सदर कामाचे अंदाजपत्रक तयार करून देणे करिता आरोपी लोकसेवक महाजन यांनी तक्रारदार यांच्याकडे लाच मागणी केल्याबाबतची तक्रार दि.14/10/2024 रोजी ला.प्र.वि. अहिल्यानगर येथे प्राप्त झाली होती. सदर लाच मागणी तक्रारीच्या अनुषंगाने दि.15/10/2024 रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली. लाच मागणी पडताळणी दरम्यान आरोपी लोकसेवक राकेश पुंडलिक महाजन, सहाय्यक अभियंता यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचा समक्ष 5,000/- रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले. दि.15/10/2024 रोजी आयोजित सापळा कारवाई दरम्यान आरोपी लोकसेवक महाजन यांनी तक्रारदार यांचे कडून 5,000/- रुपयाची लाच स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांचे विरुद्ध सुपा पोलीस ठाणे, जिल्हा अहिल्यानगर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.