सांगली, दि.३०: कबड्डी, कुस्ती, खो खो ,क्रिकेट आणि मैदानी खेळ यासाठी सांगली देशभर प्रसिद्ध आहे. या नगरीचे क्रीडावैभव आणखी बहरावे हाच माझा अजेंडा आहे, असे उद्गार आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी काढले. जिल्हा क्रीडा संकुल परिसरातील क्रीडापटू, व्यायामपटू आणि ज्येष्ठ नागरिक यांची आज आमदार गाडगीळ यांनी भेट घेतली. त्यांच्याबरोबर चर्चा केली. खेळाच्या विकासविषयक त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या.
आमदार गाडगीळ म्हणाले, सांगली ही क्रीडेची
गोपाळपुरी म्हणून पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. कुस्ती, कबड्डी, क्रिकेट, बॅडमिंटन, मैदानी खेळ, मुष्टीयुद्ध अशा विविध क्रीडा प्रकारात येथील खेळाडूंनी या शहराचे आणि जिल्ह्याचे नाव देशभर प्रसिद्ध केले आहे. किंबहुना जगात सुद्धा या शहराची क्रीडा पताका फडकली आहे.
या शहराचा क्रीडानगरी म्हणून आणखी विकास व्हावा, खेळाडूंना आणखी सुविधा मिळाव्यात आणि ऑलिंपिकपर्यंत आपल्या खेळाडूंनी चमकावे यासाठी माझा क्रीडा विकासाचा अजेंडा राहील. यावेळी माजी नगरसेविका सविता मदने,विजय साळुंखे, प्रथमेश वैद्य, अनिकेत खिलारे, सागर बिजरगी, कृष्णा कडणे, शिवम चव्हाण आदि उपस्थित होते.
फोटो कॅप्शन
सांगली : आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी संजय भोकरे महाविद्यालय परिसरातील क्रीडापटू, व्यायामपटू आणि ज्येष्ठ नागरिक यांची भेट घेऊन चर्चा केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.