Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बायकोला गुटख्याचे व्यसन! रात्री पतीच्या खिशातून चोरून खात होती गुटखा, पोलिस ठाण्यात पोहोचला वाद

बायकोला गुटख्याचे व्यसन! रात्री पतीच्या खिशातून चोरून खात होती गुटखा, पोलिस ठाण्यात पोहोचला वाद
 

नवरा-बायकोमध्ये अनेकदा छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडणं होत असतात. पण काही वेळा किरकोळ कारणावरून झालेले भांडण मोठ्या प्रमाणात वाढत जातात. असाच एक प्रकार यूपीतील आग्रा येथेही समोर आला आहे.

येथील कौटुंबिक समुपदेशन केंद्रात दरवेळी नव नवे प्रकरण समोर येत असले तरी यावेळी पुढे आलेले प्रकरण सर्वांना चक्रावून सोडणारे होते. कौटुंबिक समुपदेशन केंद्रात पती-पत्नीचे भांडणाचे कारण ऐकून सर्वांनी डोक्यावर हात मारून घेतला. कारण पत्नी चोरून पतीच्या खिशातून गुटखा खण्यावरून दोघांमध्ये वाद झाल्याचे कारण पुढे आले. दरम्यान, दोघांचे समुपदेशन करण्यात आहे व तडजोड करण्यात आली. यात बायको गुटखा खाणार नाही असं ठरलं. तर नवरा ही घराबाहेर गुटखा खाणार नसल्याचं त्यानं मान्य केलं.

गुटखा खाण्यावरून पत्नी आणि पतीमध्ये भांडण झाले होते. या मुळे विवाहिता ही पतीला सोडून दोन महिन्यांपासून माहेरी राहत होती. या प्रकरणी पतीने पोलिसांत तक्रार दिली होती. तर पत्नीने त्याच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता. यानंतर समुपदेशन केंद्रात पती पत्नीसह दोन्ही बाजूंच्या नातेवाईकांना बोलावण्यात आले. दोघांच्याही बाजू ऐकण्यातअ आल्या. यावेळी पती ने पत्नीला गुटखा खाण्याचे व्यसन असून ती त्याच्या खिशातून चोरून गुटखा खात असल्याची तक्रार केली. काम करून तो रात्री घरी आल्यावर खिशात ठेवलेला गुटखा बायको कडून चोरून खात होती. सुरवातीला ती गुटखा साफ करून खात होती. मात्र, त्यानंतर तिला गुटख्याचं व्यसन जडलं. त्याच्या खिशातून ती रोज गुटखा चोरून खाऊ लागली.

एके दिवशी सकाळी खिशात गुटखा न सापडल्याने त्याचे पत्नीशी भांडण झाले. तिने गुटखा खाल्ला असून देखील बायकोही पतीशी भांडण केले. पती सकाळी फ्रेश होण्यासाठी गेला असता तिने त्याच्या खिशातून गुटखा काढून खाल्ला. त्याने या कारणावरून पत्नीला मारहाण देखील केली. यानंतर पत्नी तिच्या आई-वडीलांकडे निघून गेली. त्यानंतर दोघेही एकत्र राहणार नसल्याचं ठरले. पतीने पोलीसांत धाव घेतली व या प्रकरणी तक्रार दिली. तर पत्नीने देखील पोलीसांत धाव घेत पती विरोधात मारहाणीची तक्रार दिली. हे सर्व ऐकून समुपदेश केंद्रातील अधिकारी देखील चक्रावून गेले. त्यांनी दोघामध्ये समेट घडवून आणला व दोघेही गुटखा खाणार नाही असे लिहून घेतले. दरम्यान, ही घटना सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. या वर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी पत्नीची बाजू घेतली तर काहींनी पतीची बाजू घेत मजेशीर कमेन्ट केल्या आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.