Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गायीचे की म्हशीचे, शरीरासाठी कोणते तूप जास्त फायदेशीर? फरक काय?

गायीचे की म्हशीचे, शरीरासाठी कोणते तूप जास्त फायदेशीर? फरक काय?
 

मुंबई: तुपाचे आरोग्यदायक फायदे तर आपण सर्वच जाणतो. अनेकांना असे वाटते की तूप खाल्ल्याने आपले वजन वाढते. पण जर तुम्हाला कोणी सांगितले की तूप खाल्ल्याने तुमच्या शरीरातील चरबी वाढण्याच्या ऐवजी कमी होते, तर तुमचा यावर विश्वास बसेल का?

मात्र हे खरे आहे. मर्यादित आणि योग्य प्रमाणात तूप खाल्ल्याने आपण शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करू शकतो. पण आता असा प्रश्न पडतो की कोणते तूप खाल्ल्याने शरीराला फायदा होऊ शकतो? आज आपण गाय आणि म्हशीच्या तुपातील फरक, तसेच वजन कमी करण्यासाठी कोणते तूप खावे आणि ज्यांना वजन वाढवायचे आहे त्यांनी कोणते तूप खावे, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.

गाईचे तूप खाण्याचे फायदे

गाईच्या तुपात अनेक प्रकारची जीवनसत्त्वे असतात. याच्या सेवनाने शरीराला व्हिटॅमिन ए, डी, ई, के आणि अँटीऑक्सिडंट्स मिळतात. गाईच्या तुपात आढळणारे अँटिऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्सचे प्रमाण वाढू देत नाहीत, यामुळे लवकर येणारे वृद्धत्व आणि विशिष्ट प्रकारच्या कर्करोगापासूनही आपले संरक्षण होते. हे फ्री रॅडिकल्स शरीराला आतून नुकसान करण्याचे काम करतात. गायीचे तूप शरीरात अतिरिक्त चरबी जमा होऊ देत नाही. परिणामी वजन कमी करण्यास मदत होते.

म्हशीचे तूप खाण्याचे फायदे

म्हशीच्या दुधापासून बनवलेले तूप लठ्ठपणा वाढवण्याचे काम करते. जे लोक खूप पातळ आहेत आणि वजन वाढवू इच्छितात त्यांच्यासाठी हे खूप चांगले आहे. म्हशीचे तूप हाडे मजबूत करण्याचे काम करते. जर तुम्हाला बॉडी बिल्डिंग किंवा मसल बिल्डिंग करायची असेल तर म्हशीचे तूप तुमच्यासाठी जास्त फायदेशीर ठरेल.

ज्या लोकांना जास्त अशक्तपणा वाटतो आणि थकवा जाणवतो त्यांनीही म्हशीचे तूप सेवन करावे. यातील पोटॅशियम-मॅग्नेशियम आणि फॉस्फरस सारखे गुणधर्म शरीरात रक्तप्रवाह सुरळीत ठेवतात आणि ऊर्जा पातळी राखण्यास मदत करतात.

गाय आणि म्हशीच्या तुपातील फरक काय

गाईचे तूप हलके पिवळे असते तर म्हशीच्या दुधापासून बनवलेले तूप पूर्णपणे पांढरे असते. गाईच्या तुपात चरबीचे प्रमाण कमी असते तर म्हशीच्या तुपामध्ये भरपूर चरबी असते. गाईच्या तुपात जीवनसत्त्वे, खनिजे आणि कॅल्शियम आढळतात, तर म्हशीच्या तुपात मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस मिळतात. गाईच्या तुपाच्या तुलनेत म्हशीच्या तुपाचे पौष्टिक मूल्य खूपच कमी असते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.