Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सुधीरदादांना विजयी करणे जागरूक नागरिकांचे कर्तव्य नरेंद्रभाई जानी; गायत्री परिवारातर्फे सत्कार

सुधीरदादांना विजयी करणे जागरूक नागरिकांचे कर्तव्य नरेंद्रभाई जानी; गायत्री परिवारातर्फे सत्कार
 

सांगली, दि.२७ : सांगली विधानसभा मतदारसंघालाच नव्हे; तर एकूणच राजकीय क्षेत्राला आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्यासारख्या सज्जन,कार्यतत्पर  आणि प्रामाणिक अशा नेत्याची गरज आहे. त्यामुळे त्यांना सांगलीतून पुन्हा विजयी करणे हे जागरूक नागरिकांचे कर्तव्य आहे, असे उद्गार गायत्री परिवाराचे प्रमुख नरेंद्रभाई जानी यांनी काढले. गायत्री परिवारातर्फे प्रत्येक रविवारी तात्यासाहेब मळा येथील केंद्रात धार्मिक कार्यक्रम केला जातो. त्या कार्यक्रमात सुधीरदादा गाडगीळ यांना निमंत्रित करण्यात आले होते.  

अमितभाई शहा यांनी पुष्पहार घालून सुधीरदादांचा  सत्कार केला. यावेळी गायत्री मंत्राचे पठण झाले आणि नरेंद्रभाई जानी यांनी उपस्थित सर्वांनी सुधीरदादांना विजयी भव असा आशीर्वाद द्यावा अशी विनंती केली. त्यानुसार सर्वांनी हात उंचावून दादांना आशीर्वाद दिला.

नरेंद्रभाई जानी म्हणाले, सुधीरदादा गाडगीळ यांना मी मुद्दाम येथे आज निमंत्रित केले आहे. राजकारणात त्यांच्यासारखी व्यक्ती दुर्मिळ असते. त्यामुळे त्यांच्या पाठीशी सर्व समाजाने खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे. आजचे राजकारण काय परिस्थितीत आहे हे आपण पाहतो. अशावेळी चांगल्या व्यक्ती राजकारणात असणे हे समाजाच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. सुधीरदादा गाडगीळ यांची म्हणूनच सांगलीच्या विकासासाठी,  सांगली अधिक चांगली करण्यासाठी विधानसभेत गरज आहे. त्यांना सर्वांनी आपणहून पाठिंबा द्यावा आणि आपल्या परिसरात स्वतःहून त्यांचा सर्वांनी प्रचार करावा. यावेळी अमरकांत यादव, तुकाराम शेटे, नलिनी पवार, सरिता यादव, गौरी पटेल, हिरामणी सारडा, राधा पटेल, सुरेश पवार आदी उपस्थित होते.
.
फोटो 

सांगली: गायत्री परिवारातर्फे आमदार सुधीरदादा गाडगीळ  यांचा पुष्पहार घालून सत्कार करताना अमितभाई शहा. सोबत गायत्री परिवाराचे प्रमुख नरेंद्रभाई जानी

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.