पतीसह पिकनिकला गेलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार, व्हिडीओही बनवले, गुन्हा नोंदवण्यासाठी पीडितांची वणवण
एका पर्यटनस्थळावर पतीसह पिकनिकसाठी गेलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशमध्ये घडली आहे. मध्य प्रदेशमधील अल्ट्रा सोलर प्लँट आणि भैरवबाबासाठी प्रसिद्ध असलेला गुढमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला.
येथे पिकनिकसाठी आलेल्या एका दाम्पत्याला बंधक बनवून आरोपीनी हे कुकृत्य केले. यादरम्यान, आरोपींनी या संपूर्ण घटनेचा व्हिडीओही बनवला. तसेच तो व्हायरल करण्याची धमकीही दिली. आता पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून घेत अनेक संशयितांना ताब्यात घेतले आहे.रीवा जिल्ह्यामधील गुढ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भैरव बाबा पर्यटनस्थळाजवळ एक तरुण दाम्पत्य पिकनिकसाठी गेलं होतं. याचदरम्यान पाच आरोपींनी त्यांना मारहाण केली. तसेच पतीला बंधक बनवून त्याच्या पत्नीवर आळीपाळीने बलात्कार केला.
याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, ही घटना सोमवारी घडली. आरोपींनी संपूर्ण घटनेचा व्हिडीओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या पीडितांनी तक्रार नोंदवली नव्हती. त्यानंतर मंगळवारी याबाबतची तक्रार दाखल झाल्यावर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. आता काही दिवसांनंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवत तपासाला गती दिली असून, काही संशयितांना ताब्यात घेतलं आहेत. पीडितेने या प्रकरणात पाच आरोपींचा सहभाग असल्याचे सांगितले होते. पोलिसांनी त्यानुसार सुत्रे हलवत ५ आरोपींनी अटक केली आहे. इतर आरोपींचाही शोध सुरू आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.