Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दूध आणि मासे एकत्र खाल्ल्याने स्किनवर पांढरे डाग पडतात? विज्ञान काय सांगतं?

दूध आणि मासे एकत्र खाल्ल्याने स्किनवर पांढरे डाग पडतात? विज्ञान काय सांगतं?


मासे आणि दूध या दोन्ही पदार्थांमध्ये भरपूर पोषक घटक असतात आणि त्यांचे वेगवेगळे उपयोग आहेत. माशांमध्ये प्रोटीन, विविध व्हिटॅमिन्स, ओमेगा 3 फॅटी अॅसिड्स हे घटक मुबलक प्रमाणात असतात.

दुधात कॅल्शियम, प्रोटीन, आयोडीन, पोटॅशियम, फॉस्फरस इत्यादी घटक असतात. तरीदेखील मासे आणि दुधाचं एकत्र सेवन करू नये असा सल्ला दिला जातो. काही जण तर असंही म्हणतात, की मासे आणि दूध एकत्र खाल्ल्यास कुष्ठरोग होतो. मासे आणि दूध एकत्र खाण्याबाबत अनेक समज-गैरसमज आहेत. काहींच्या मते, हे दोन पदार्थ एकत्र खाल्ल्याने पोटदुखी किंवा अॅसिडिटी यांसारख्या पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केला, तर याबाबत कोणताही ठोस निष्कर्ष नाही; पण आयुर्वेदात मासे आणि दूध एकत्र न खण्याचा सल्ला दिला आहे.

आयुर्वेदात निषिद्ध
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मासे आणि दूध या दोन्हीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं; पण त्याचं प्रमाण वेगवेगळं असतं. म्हणूनच आयुर्वेदात मासे आणि दुधाला विरुद्ध आहार म्हटलं गेलं आहे. म्हणजे दोन्ही पदार्थ एकत्र खाण्यास मनाई आहे. आयुर्वेदानुसार मासे उष्ण गुणधर्माचे आणि दूध थंड गुणधर्माचं आहे. त्यांच्या या अंगभूत गुणांमुळे समस्या निर्माण होतात.


आयुर्वेदानुसार मासे आणि दुधाचं एकत्र सेवन केल्याने त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात; पण कुष्ठरोगाबद्दल काहीही सांगितलेलं नाही. दूध आणि मासे एकत्र खाल्ल्याने कुष्ठरोग होतो, हा फक्त एक गैरसमज आहे. कुष्ठरोग किंवा कोड येणं हा एक ऑटोइम्युन आजार आहे. रुग्णाची रोगप्रतिकारशक्ती त्वचेला रंग देणाऱ्या पेशींविरुद्ध अँटीबॉडी तयार करते. त्यामुळे रुग्णाच्या त्वचेवर पांढरे डाग पडतात.

मेडिकल सायन्समध्ये काय म्हटलं आहे?
मासे आणि दूध एकत्र खाल्ल्याने आरोग्याची हानी होते, ही बाब मेडिकल सायन्समध्ये सिद्ध झालेली नाही. मासे किंवा दुधाची अ‍ॅलर्जी असेल तरच त्यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. मासे योग्य प्रकारे शिजवले नसतील तर त्यांचं सेवन केल्याने व्यक्तीला त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.


पाश्चात्य देशांमध्ये जेव्हा लोक खूप आजारी पडतात आणि त्यांना खूप अशक्तपणा येतो तेव्हा लवकर बरं होण्यासाठी ते दूध आणि मासे एकत्र खातात. तुम्हाला अ‍ॅलर्जी नसेल आणि तुम्ही मासे आणि दूध एकत्र खाल्लं तर काहीही नुकसान होणार नाही. अ‍ॅलर्जी नसूनही अस्वस्थ वाटत असेल तर सेन्सिटिव्हिटीची समस्या असू शकते. साधारणपणे, संतुलित आहारामध्ये विविध पदार्थांचा समावेश असला पाहिजे; पण विशिष्ट पदार्थ एकत्र खाल्ल्याने समस्या उद्भवत असतील तर ते टाळावेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.