बॉसने 'सीक लिव्ह'चा पुरावा मागितला! मुळव्याधग्रस्त कर्मचाऱ्याने पाठवला 'तो' प्रायव्हेट फोटो! मग......
कंपनीत काम करताना अचानक आजारपण आले की, कुणीही सीक लिव्ह अर्थात आजारी रजा घेतो. पण त्यासाठी मेडीकल सर्टीफिकेट अर्थात वैद्यकीय पुरावा द्यावा लागतो. अशाच एका कर्मचाऱ्याला मुळव्याधीचा (पाईल्स) त्रास सुरु झाला. त्याने कंपनीला आपण मूळव्याध ग्रस्त आहोत आणि कोणत्याही स्थितीत उभे राहू शकत नाही, असे व्यवस्थापकाला कळवले.
बाॅसने जेव्हा त्यांच्या वैद्यकीय स्थितीचा वैध पुरावा मागितला. तेव्हा कर्मचाऱ्याने कर्मचाऱ्याने चक्क मुळव्याधीचा त्रास होत असलेल्या ठिकाणाचा प्रायव्हेट फोटो पाठवला की कंपनीच्या लोकांनी तो पाहिल्यानंतर त्यांनाही धक्का बसला.
कर्मचाऱ्यांने वैद्यकीय पुरावा, डाॅक्टरांची प्रिस्क्रिप्शन अथवा इतर वैद्यकीय कागदपत्रे कंपनीला देणे अपेक्षित होते, पण त्याने तसे काहीही केले नाही. मूळव्याधीने ग्रस्त कर्मचाऱ्याने व्यवस्थापकाला नेहमीच्या पद्धतीने उत्तर देण्याची तसदी घेतली नाही. त्यांनी कोणतीही डॉक्टरची नोंद किंवा उपचाराची कागदपत्रे कंपनीसोबत शेअर केली नाहीत, त्याऐवजी त्यांनी जे केले ते खूपच धक्कादायक होते.
कर्मचाऱ्याची पोस्ट अन् चिंता
घटनेचे वर्णन करताना, कर्मचाऱ्याने आपले म्हणणे पोस्ट केले आहे. यासंदर्भात टाइम्स नाऊने वृत्त दिले आहे. या कर्मचाऱ्याने म्हटले आहे की, आपल्याला मूळव्याध आहे आणि ते जास्त वेळ उभा राहू शकत नाही, असे त्यांनी जेव्हा व्यवस्थापकाला सांगितले होते. तेव्हा विशेष म्हणजे या कर्मचाऱ्याला पुराव्यासंदर्भात व्यवस्थापकाने विचारणा केली. त्यावर हे कर्मचारी नमूद करतो की, व्यवस्थापकाला मूळव्याध असलेला एक फोटो पाठवला,"या पोस्टवर एका व्यक्तीने यावर प्रश्न केला आणि विचारले की, जेव्हा असा फोटो पाठवला त्यामुळे नग्नतेची चिंता सतावणार नाही का... त्यावर उत्तर देताना मुळव्याधग्रस्त कर्मचाऱ्याने लिहीले की,"आता, त्याबद्दल मी विचार करत आहे. मला खात्री नाही की मी व्यवस्थापकाला जो फोटो पाठवला त्यातून मी कंपनीचे कोणतेही नियम किंवा कायदे तोडले आहेत की नाही."
'आजार सोडा वेगळाच त्रास उद्भवणार नाही ना..?'
मुळात असा फोटो या कर्मचाऱ्याने पाठवल्यानंतर त्याला आता चिंता सतावत आहे. जर मला एचआर किंवा पोलिसांना त्रास होईल का? अशी चिंताही त्याने आपल्या उत्तरात नमूद केली आहे. व्यवस्थापकाने वैद्यकीय समस्येचा पुरावा मागितला असता, कर्मचाऱ्याने फोटोंद्वारे त्यांची स्थिती उघडण्यास अजिबात संकोच केला नाही. त्यानंतर हा कर्मचारी आता मात्र थोडा चिंतेत दिसत आहे.
सोशल मीडियावर चर्चा
मूळव्याध झाल्याचा आणि अत्यंत वेदना होत असल्याचा पुरावा सादर करून, त्यांनी नियुक्त केलेले वैद्यकीय कागदपत्रे आणि प्रिस्क्रिप्शन बाहेर ठेवले आणि त्याऐवजी त्यांच्या वरिष्ठांना त्यांच्या शरीराच्या खाजगी भागाचा फोटो पाठवून मुळव्याधीची स्थिती दाखवली ही चुक केली की काय असे त्या कर्मचाऱ्यांना एकीकडे वाटत आहे तर दुसरीकडे आता या विषयाची चर्चाही सोशल मीडियावर होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.