बाबा सिद्धीकांच्या हत्येची गंभीर दखल; निवडणूक आयोगाने घेतला 'हा' निर्णय
केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेत महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान होईल.
आता राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे.
आचारसंहिता लागण्याच्या दोन दिवस आधीच महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली. या घटनेबाबत निवडणूक आयुक्तांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी निवडणूक काळात हिंसाचाराची कोणतीही घटना घडू नये, यासाठी पोलीस आणि प्रशासनाला आदेश दिल्याचं आवर्जून नमूद केलं.
बाबा सिद्धीकींच्या हत्येची गंभीर दखल
एका मोठ्या नेत्याच्या हत्येबाबत राजीव कुमार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, "आम्ही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. आम्ही स्पष्ट सांगतो, पोलीस आणि प्रशासनाला सांगतो, कोणत्याही प्रकारची हिंसा आणि गुन्हेगारी होता कामा नये. आम्ही थेट सूचना दिल्या आहेत. कोणत्याही प्रकारची हिंसा आणि कोणत्याही राजकीय नेत्यावर हल्ला होता कामा नये", अशी प्रतिक्रिया मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.
महासंचालकाच्या बदलीबाबत केलं वक्तव्य
निवडणूक असल्याने रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरुन हटवावे. त्यांच्यावर गंभीर आरोप आहेत, अशी मागणी काँग्रेसने यापूर्वी केली होती. हाच निवडणूक आयुक्तांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी थोडक्यात उत्तर दिलं. राजीव कुमार म्हणाले, "महासंचलाकांची नियुक्ती ही यूपीएससी करते. सीनिअर व्यक्तीला पद देणं व कोणत्या ठिकाणं देणं, हे काम यूपीएससीकडून होतं." असं राजीव कुमार यांनी स्पष्ट केलं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.