रतन टाटांच्या निधनानंतर मुंबई पोलिसांचं ट्विट होतंय तुफान व्हायरल
सुप्रसिद्ध भारतीय उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी रात्री मुंबईमधील ब्रीच कँडी रुग्णालयात ८६ व्या वर्षी निधन झाले. भारताच्या उद्योग क्षेत्रात अभिमानाने रतन टाटा यांचे नाव घेतले जाते. त्यांनी एक व्यक्ती आणि उद्योजक म्हणून जगण्याचे अनेक नवे मापदंड घालून दिले आहेत. रतन टाटा यांच्या निधनानंतर प्रत्येक क्षेत्रामधून हळहळ व्यक्त होत आहे. रतन टाटा यांची कर्मभूमी मुंबई आहे. टाटा घराण्यातील इतर व्यक्तीप्रमाणेच रतन टाटा यांचाही मुंबईशी एक खास संबंध होता. या पार्श्वभूमीवर रतन टाटा यांच्या निधनानंतर मुंबई पोलिसांनी सोशल मीडियावर एक ट्विट केले आहे. आणि हेच ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुंबई पोलिसांच्या एका वेगळ्या पद्धतीच्या केलेल्या ट्विटची चर्चा होत आहे. सध्या रतन टाटा यांच्या निधनानंतर मुंबई पोलिसांच्या ट्विट हँडलवरुन करण्यात आलेले एक ट्विटची सध्या चर्चेची विषय ठरत आहे. या सोशल मीडियावरील ट्विटमध्ये एक प्रतिमा तयार करण्यात आली आहे. टाटा उद्योगसमूहाचे भले मोठे चिन्ह आणि त्यावरून बाहेर चालत जाणारा व्यक्ती प्रतिमेमध्ये दाखवण्यात आला आहे. या प्रतिमेच्या खाली असे लिहण्यात आले आहे. तर या ट्विटसोबत 'TaTa Legend 'असे कॅप्शन लिहण्यात आली आहे.
मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात रतन टाटा यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरु होते. दोन दिवसांपूर्वीच रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली होती. परंतु, त्यानंतर रतन टाटा यांच्याकडून प्रसिद्धीपत्रक जारी करत माझी प्रकृती व्यवस्थित असून मी रुग्णालयात काही वैद्यकीय चाचण्या करण्यासाठी आसल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, बुधवारी रतन टाटा यांची प्रकृती खालावत गेली आणि रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. सध्या रतन टाटा यांचे पार्थिव कुलाबा येथील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले आहे. यानंतर सर्व सामान्यांना त्यांचे अंत्यदर्शन घेता यावे, यासाठी रतन टाटा यांचे पार्थिव नरिमन पॉईंट येथील एनसीपीए येथे सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत ठेवण्यात येणार आहे. यानंतर वरळी मधील स्मशानभूमीत रतन टाटा यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.