Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची दिल्ली येथील साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड

प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची दिल्ली येथील साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
 

पुण्यात साहित्य परिषदेकडून करण्यात आली. ८३ वर्षाच्या तारा भवाळकर या लोक संस्कृतीच्या गाढ्या अभ्यासक आहेत. ९८ वर्षात ५ महिला साहित्यिकांनी संमलेनाचे अध्यक्षपद भूषवले असून सहाव्या अध्यक्षपदाचा मान डॉ. तारा भवाळकर यांना मिळाला आहे.भवाळकर यांनी लोकसाहित्य, लोकसंस्कृती, लोकपरंपरा आणि लोककला विषयांचं विपुल प्रमाणात लेखन केलं आहे.

लोकसंस्कृती, नाट्यसंशोधन, संतसाहित्य, एकांकिका, ललित लेखन, लोककला आणि स्त्री जाणिवांवर भाष्य करणारे लेखन त्यांनी केलं आहे. मराठी विश्वकोश, मराठी वाड्मयकोश आणि मराठी ग्रंथकोश या महत्त्वाच्या कार्यातही त्यांनी केलेलं योगदान

अत्यंत महत्वाचं आहे.प्राध्यापक म्हणून त्यांनी अनेक वर्ष आपली सेवा दिली असून निवृत्त झाल्यावर पुण्यातील ललित कला अकॅडमी आणि मुंबई विद्यापीठ लोककला अकॅडमीमध्ये त्यांनी अतिथी प्राध्यापक म्हणून काम केलं आहे.

१९५४ साली दिल्लीत अखिल भारतीय साहित्य संमेलन झाले होते आणि त्या संमेलनाचे अध्यक्षपद तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी भूषविले होते. आता ७० वर्षानंतर दिल्लीत ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात केले आहे. ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची साहित्यसंपदा अशी आहे.

मरणात खरोखर जग जगते (कथासंग्रह)

तिसऱ्या बिंदूच्या शोधात (वैचारिक)

निरगाठ सुरगाठ (लेखसंग्रह)

प्रियतमा ( गडकरी साहित्यातील स्त्री प्रतिमा)

मराठी नाट्यपरंपरा : शोध आणि आस्वाद

मराठी नाटक : नव्या दिशा, नवी वळणे

यक्षगान आणि मराठी नाट्य परंपरा

लोकनागर रंगभूमी (माहितीपर)

लोकपरंपरा आणि स्त्रीप्रतिभा

आकलन आणि आस्वाद (साहित्यिक)

माझिये जातीच्या (सामाजिक)

मातीची रूपे (ललित)

बोरीबाभळी (रा.रं. बोराडे यांच्या ग्रामीण स्त्रीविषयक कथांचे संपादन आणि प्रस्तावना)

मधुशाळा (हरिवंशराय बच्चन यांच्या 'मधुशाला'चे मराठीतले पहिले मराठी भाषांतर)

लोकनागर रंगभूमी (माहितीपर)

लोकपरंपरा आणि स्त्रीप्रतिभा (माहितीपर)

लोकपरंपरेतील सीता

लोकसंचित (वैचारिक)

लोकसाहित्य : वाड्मयप्रवाह

लोकसाहित्याच्या अभ्यासदिशा (माहितीपर)

लोकांगण (कथासंग्रह)

संस्कृतीची शोधयात्रा (माहितीपर)

स्त्रीमुक्तीचा आत्मस्वर (वैचारिक)

स्नेहरंग (वैचारिक)

तारा भवाळकर यांचे साहित्य क्षेत्रातलया मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

लोकसाहित्याच्या गाढ्या अभ्यासक ताराताई भवाळकर- ज्येष्ठ साहित्यिका अरुणा सबाने

लोकसाहित्याच्या गाढ्या अभ्यासक ताराताई भवाळकर. खूप खूप अभिनंदन. तुम्ही लवकरच अध्यक्ष होणार याची खात्रीच होती. तसा तर आधीच खूप उशीर झाला. पण हेही नसे थोडके. ताराताई लोकसंस्कृती, लोक साहित्य, लेखन, नाटक, दिग्दर्शन, अभिनय, समीक्षा, संशोधन अशा विविध प्रांतात प्रचंड लेखन केलेले आहे. स्त्रीवादी समीक्षा विशेषतः लोक साहित्याच्या अंगाने हा ताईंचा विशेष आवडता विषय. आयुष्यभर त्यांनी अनेक सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमात सहभाग घेतला. माझी अत्यंत जवळची मैत्रीण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची अध्यक्ष झाली याचा मला अतिव आनंद झालेला आहे. विशेष म्हणजे एका योग्य व्यक्तीची निवड झाली याचाही आनंद आहे. ताराताईंची पाच पुस्तके मी प्रकाशित केली ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. तारा ताई लव यू लव यू लव यू.

एका अभ्यासू व्यक्तिमत्वाचा गौरव! - ज्येष्ठ कवी प्रशांत पनवेलकर

फेब्रुवारी २०२५ ला दिल्ली येथे होणाऱ्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसाहित्य व लोकसंस्कृतीच्या अभ्यासक सुप्रसिद्ध लेखिका प्रा. डाॅ. तारा भवाळकर यांची निवड झाली.अ.भा. म. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान या आधी कुसुमावती देशपांडे-ग्वाल्हेर, दुर्गा भागवत -क-हाड, शांता शेळके-आळंदी, डाॅ.विजया राजाध्यक्ष-इंदुर आणि अरुणा ढेरे -यवतमाळ यांना प्राप्त झाला होता.डॉ. तारा भवाळकर हार्दिक अभिनंदन!

Next Story

मरणात खरोखर जग जगते (कथासंग्रह)

तिसऱ्या बिंदूच्या शोधात (वैचारिक)

निरगाठ सुरगाठ (लेखसंग्रह)

प्रियतमा ( गडकरी साहित्यातील स्त्री प्रतिमा)

मराठी नाट्यपरंपरा : शोध आणि आस्वाद

मराठी नाटक : नव्या दिशा, नवी वळणे

यक्षगान आणि मराठी नाट्य परंपरा

लोकनागर रंगभूमी (माहितीपर)

लोकपरंपरा आणि स्त्रीप्रतिभा

आकलन आणि आस्वाद (साहित्यिक)

माझिये जातीच्या (सामाजिक)

मातीची रूपे (ललित)

मधुशाळा (हरिवंशराय बच्चन यांच्या 'मधुशाला'चे मराठीतले पहिले मराठी भाषांतर)

लोकनागर रंगभूमी (माहितीपर)

लोकपरंपरा आणि स्त्रीप्रतिभा (माहितीपर)

लोकपरंपरेतील सीता

लोकसंचित (वैचारिक)

लोकसाहित्य : वाड्मयप्रवाह

लोकसाहित्याच्या अभ्यासदिशा (माहितीपर)

लोकांगण (कथासंग्रह)

संस्कृतीची शोधयात्रा (माहितीपर)

स्त्रीमुक्तीचा आत्मस्वर (वैचारिक)

स्नेहरंग (वैचारिक)

तारा भवाळकर यांचे साहित्य क्षेत्रातलया मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

लोकसाहित्याच्या गाढ्या अभ्यासक ताराताई भवाळकर- ज्येष्ठ साहित्यिका अरुणा सबाने

एका अभ्यासू व्यक्तिमत्वाचा गौरव! - ज्येष्ठ कवी प्रशांत पनवेलकर
 

 

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.