Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'शिंदेंनी घात केला उद्धव ठाकरे देव होते', बंडात सहभागी आमदार ढसाढसा रडला!

'शिंदेंनी घात केला उद्धव ठाकरे देव होते', बंडात सहभागी आमदार ढसाढसा रडला!
 

भाजपची चौथी यादी प्रसिद्ध झाली आहे. या यादीत एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेली पालघरची जागा भाजपकडे गेल्याचे स्पष्ट झाले आहे. येथून भाजपने राजेंद्र गावीत यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

त्यामुळे येथून शिवसेनेचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांनी संधी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर श्रीनिवास वनगा यांन शिंदेना साथ दिली होती. आपल्याला उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर श्रीनिवास वनगा यांनी हे आत्महत्येच्या विचारात असल्याचा खळबळजनक दावा त्यांच्या पत्नी आणि आईने केला आहे. या विषयी वृत्त 'साम टिव्ही'ने दिले आहे.

तिकीट कापल्याने श्रीनिवास वनगा यांना रडू यांना कोसळले. मला चांगली संधी होती, मतदारसंघात मी काम केलं, विकासकामं केली.माझ्या वडिलांपासून मी केलेल्या प्रामाणिकपणाच फळ आम्हाला हेच मिळालं का? प्रत्येक वेळी गावितला मिळाले, असे म्हणत श्रीनिवास वनगा ढसाढसा रडले.

श्रीनिवास वनगा हे 2019 मध्ये पालघर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात होते. शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. श्रीनिवास वनगा यांनी काँग्रेसच्या योगेश नम यांचा पराभव केला आहे.

बंडात शिंदेना साथ

शिवसेनेमध्ये ऐतिहासिक फूट पडली होती. एकनाथ शिंदे यांनी बंड करत 40 आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेले होते. त्यावेळी एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या नेत्यांमध्ये श्रीनिवास वनगा यांचा देखील समावेश होता.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.