Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुणे :- पुरंदरच्या तहसीलदारांना निवडणूक कामकाजातून हटवले

पुणे :- पुरंदरच्या तहसीलदारांना निवडणूक कामकाजातून हटवले
 

सासवड - भारत निवडणूक आयोग यांनी मुख्य निवडणूक अधिकारी पुरंदर, विधानसभा मतदारसंघाकरिता अधिसूचित असलेल्या तहसीलदार पदावर कार्यरत असलेले विक्रम रजपुत यांना निवडणुकीच्या कामकाजापासून अलिप्त ठेवण्याचे व त्यांच्या जागी पुणे महानगरचे तहसीलदार सचिन म्हस्के यांची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे आदेश विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले आहेत.

आदेशात म्हटले आहे की, हे सेवावर्ग आदेश आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचे अनुषंगाने पारीत करण्यात आले असून विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची संपूर्ण कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर अधिकाऱ्यांच्या सेवा त्यांच्या मूळ पदावर पूर्ववत करण्याबाबत जिल्हाधिकारी पुणे यांनी त्यांचे स्तरावरुन उचित निर्णय घ्यावा. असे देखील आदेशात नमूद केले आहे.

पुरंदरच्या तहसीलदार विक्रम राजपूत यांच्या कार्यकाळामध्ये तहसील कार्यालयामधून डेमो ईव्हीएम मशीन चोरी झाली होती. त्यामुळे तहसीलदार यांना निवडणुकीच्या कामकाजातून हटवण्यात आली असल्याची चर्चा सध्या पुरंदर तालुक्यात सुरू आहे.

ईव्हीएम मशीन चोरी प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी व सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, उपविभागीय अधिकारी यांना निलंबित करण्यात आले होते. पुरंदरमधील आणखी काही अधिकार्‍यांना निवडणुकीच्या कामापासून अलिप्त ठेवण्यात येते की काय, अशी देखील चर्चा पुरंदर मध्ये आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.