Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'गोगावलेंचे पाय धरून नमस्कार केला पाहिजे.'; शिवनेरी सुंदरीवरुन विरोधक आक्रमक

'गोगावलेंचे पाय धरून नमस्कार केला पाहिजे.'; शिवनेरी सुंदरीवरुन विरोधक आक्रमक
 

मुंबई : एस.टी.महामंडळाचे अध्यक्ष म्हणून भरत गोगावले यांनी नुकताच पदभार स्वीकारला. त्यानंतर लगेचच एस.टी.बाबत घेतलेल्या निर्णयामुळे सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. बई-पुणे महामार्गावर धावणाऱ्या एसटीच्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी शिवनेरी सुंदरी नेमण्याचा निर्णय घेतला आहे. विमानातील सेवेप्रमाणे बसमध्ये देखील सुविधा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पण या नवीन सेवांमुळे प्रवाशांच्या तिकिटावर कोणताही अधिभार न लावता प्रवाशांना चांगल्या सेवा सुविधा आणि गुणात्मक सेवेचा दर्जा उंचावेल, असा आमचा प्रयत्न असल्याचे मत एस.टी.महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी व्यक्त केले. त्यामुळे आता विरोधक आक्रमक झाले असून टीकेची झोड उठवत आहेत.

शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिवनेरी सुंदरीवरुन भरत गोगावले यांच्यावर निशाणा साधला आहे. माध्यमांशी संवाद साधताना एस.टी. महामंडळाने घेतलेल्या निर्णायवर प्रतिक्रिया दिली आहे. आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, "शिवनेरी बसमधील या महिलांना (शिवनेरी सुंदरी) छत्री द्यावी लागेल. कारण बसमध्ये पावसाचं पाणी गळतं. खरं म्हणजे विमानाची आणि बसची तुलना करणं म्हणजे भरत गोगावलेंचे पाय धरून नमस्कार केला पाहिजे. आपण पाहिलं तर एसटी महामंडळाकडे चार चांगल्या बस नाहीत. किमान चांगले ड्रायव्हर ठेवू, कंडक्टर ठेवू असं काहीतरी म्हणा. आता 'शिवनेरी सुंदरी'ना काय काम देणार हे त्यांनी सांगावं?", असा खोचक टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.

आनंद आरोग्य केंद्र आणि बचत गट स्टॉल

राज्य सरकारकडून एस.टी. स्टॅन्डवर आणखी काही मुलभूत सुविधा आणि बदल करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या स्मरणार्थ एसटीच्या 343 बस स्थानकांवर "आनंद आरोग्य केंद्र" या नावाने दवाखाना सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये अत्यंत माफक दरामध्ये बस स्थानकांवरील प्रवाशांबरोबरच आसपासच्या सर्व नागरिकांना कमी दरामध्ये विविध आरोग्य चाचण्या व औषधे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर एस. टी. महामंडळाच्या प्रत्येक बस स्थानकांवर त्या परिसरातील महिला बचत गटांना आपले स्थानिक पदार्थ विक्री करण्यासाठी चक्रीय पद्धतीने नाममात्र भाडे आकारुन स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.