Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सुधीरदादा गाडगीळ यांचा झंजावाती प्रचार सुरूवृत्तपत्र विक्रेते खेळाडू यांची भेट ;सविस्तर चर्चा

सुधीरदादा गाडगीळ यांचा झंजावाती प्रचार सुरू वृत्तपत्र विक्रेते खेळाडू यांची भेट ;सविस्तर चर्चा
 

सांगली, दि.२५: सांगली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी झंझावाती प्रचाराला सुरुवात केली आहे. गुरुवारी मोठ्या उत्साहात उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी पहाटेपासून दादांनी प्रचार फेरीला सुरुवात केली.

सांगली शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या केंद्राला दादांनी पहाटे भेट दिली. त्या ठिकाणी विकास सूर्यवंशी,दरीबा बंडगर आदींनी त्यांचे स्वागत केले. सर्व विक्रेते त्यावेळी उपस्थित होते. वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी महायुती सरकारने महामंडळ स्थापन केल्याबद्दल यावेळी वृत्तपत्र विक्रेत्यांनी दादांचे अभिनंदन केले व आभार मानले. दादांनी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली.

आमराईमध्ये रोज सकाळी फिरायला मोठी गर्दी असते. त्या नागरिकांची दादांनी सकाळी भेट घेतली. त्यांच्यासोबत किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पैलवान पृथ्वीराजभैय्या पवार होते. आमराई संदर्भात दादांनी तेथील नागरिकांशी चर्चा केली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथेही त्यांनी  भेट दिली. तेथे खेळाडू आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्याशी त्यांनी संवाद साधला. यावेळी सांगली शहरातील स्टेडियम तसेच खेळाडूंच्या सगळ्या विषयाबाबत कायमच मी त्यांच्या सोबत आहे असे दादांनी सांगितले.ह्यावेळी दादांच्या सोबत 
 अतुल माने, रवींद्र ढगे, उदय मुळे, चेतन माळगूळकर,भूपाल  सरगर, आशीष साळुंखे,राजू बावडेकर ,अशोक अण्णा शेट्टी संजय परमणे ,समीर शेट्टी, राजू कुंभार ,सुशांत काटे ,अनिकेत बेळगाव ,मनोज भिडे ,अभिषेक कुलकर्णी ,एस एल पाटील, युवराज कटके आदी कार्यकर्ते नागरिक पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते

फोटो कॅप्शन
१) सांगली :सांगली विधानसभा मतदारसंघातील  भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार सुधीरदादा गाडगीळ आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी शुक्रवारी सकाळी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या केंद्राला भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली.
 
२) आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी शुक्रवारी सकाळी आमराई उद्यानात भेट देऊन तेथील नागरिकांबरोबर चर्चा केली.
 
३) आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी शुक्रवारी सकाळी सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमला भेट दिली आणि तेथील खेळाडूंबरोबर संवाद साधला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.