ब्रेकिंग न्यूज : उद्यापासून महाराष्ट्रातील 'हा' महामार्ग वाहतुकीसाठी बंद होणार, पर्यायी मार्ग कसे आहेत ?
महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये रस्ते विकासाची अनेक कामे पूर्ण झाली आहेत. रस्ते विकासाच्या प्रकल्पांमुळे राज्यातील रस्ते कनेक्टिव्हिटी सुधारली आहे. मात्र महाराष्ट्रात तयार झालेल्या काही रस्त्यांची कामेही निकृष्ट दर्जाची झाली आहेत. सातारा लोणंद या राज्य मार्गावर वाठार स्टेशन हद्दीत काळी मोरी नाकाचा जुना ब्रिटिशकालीन रेल्वे पूल पाडून उभारण्यात आलेल्या नवीन पुलाचे काम सुद्धा निकृष्ट झाले आहे.
या निकृष्ट कामामुळे या पुलावरून वाहतूक करणे धोकादायक ठरू शकते. हेच कारण आहे की या पुलाची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान आता या पुलाच्या दुरुस्तीचे काम उद्यापासून हाती घेतले जाणार आहे.या दुरुस्तीच्या कामामुळे सातारा लोणंद हा राज्यमार्ग पुढील काही दिवस वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे सात ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर पर्यंत हा राज्यमार्ग काही वाहनांसाठी बंद राहणार आहे. म्हणजेच यावर सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी राहणार नाही.
मिळालेल्या माहितीनुसार या दुरुस्तीच्या कामासाठी 7 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर दरम्यान या राज्य मार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थातच या कामासाठी अवजड वाहनांना या मार्गावर प्रवेश दिला जाणार नाही, यामुळे यांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.तथापि, शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी या मार्गाने काही अवजड वाहनांना सुद्धा परवानगी दिली जाणार आहे. राज्य परिवहन बस यांना वाग्देव चौक-पिंपोडे ब्रुदूक-तडवळेमार्गे आदर्की फाटा अशी वाहतुक करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.
पण, इतर सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना या मार्गावर बंदी राहणार असल्याने आता आपण हा राज्यमार्ग अवजड वाहनांसाठी बंद राहणार असल्याने या वाहनांसाठी इतर पर्यायी मार्ग नेमके कोणते आहेत याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
कसे असणार पर्यायी मार्ग?
फलटण व लोणंद बाजूने येणारी अवजड वाहने खंडाळा, शिरवळमार्गे पुणे - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाने साताराकडे जाऊ शकतील. साताऱ्याकडून येणारी अवजड वाहतूक पुणे-बंगळुरू महामार्गाने खंडाळा शिरवळ करून लोणंदकडे जाणार आहेत.फलटण व लोणंदकरून येणारी सर्व दुचाकी वाहने आदर्की फाटा येथून तडवळे संमत वाघोलीमार्गे पिंपोडे ब्रुद्रूकवरून वाठार स्टेशनमार्गे साताऱ्याकडे जाऊ शकणार आहेत. सातारा, कोरेगाव येथून लोणंद व फलटणकडे जाणारी सर्व प्रकारची हलकी व दुचाकी वाहने आंबवडे चौक व वाग्देव चौक येथून पिंपोडे ब्रुद्रूकवरून तडवळे संमत वाघोलीवरून लोणंद व फलटणकडे जाणार आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.