सांगली, दि.९ : सांगली विधानसभा मतदारसंघातील विकासाच्या विविध योजनांची गती कायम ठेवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्याच पाठीशी उभे राहा, असे आवाहन आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी केले. हरिपूर काळीवाट (वीर शिवा काशी चौक) ते आदिसागर मंगल कार्यालयाकडे जाणारा रस्ता आणि शास्त्री चौक ते अंकली आदीसागर मंगल कार्यालयाकडे जाणारा रस्ता यांच्या भूमिपूजन प्रसंगी शास्त्री चौकात आयोजित कार्यक्रमात आमदार गाडगीळ बोलत होते.
मुख्यमंत्री सडक योजनेतून काळीवाट हरिपूर ते आदिसागर मंगल कार्यालयापर्यंतचा मुख्य रस्ता २.९३ किलोमीटर लांबीचा असून त्यासाठी 2 कोटी ३७ लाख रुपये मंजूर झाले आहेत. शास्त्री चौक ते आदिसागर मंगल कार्यालय या रस्त्याचे रुंदीकरण होणार आहे. त्यासाठी १८कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या रुंदीकरण व नव्याने होणाऱ्या रस्त्यामुळे वाहतुकीची कोंडी थांबेल आणि अपघाताचे प्रमाण कमी होईल.
आमदार गाडगीळ म्हणाले, या रस्त्यांच्या रुंदीकरणाची बरीच वर्षे मागणी होती. या मतदारसंघात मी अनेक विकासकामे केली ती सर्वांच्या सहकार्यातून केली आहेत. भारतीय जनता पक्षाचे विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक शेखर इनामदार म्हणाले, सांगली मतदार संघासाठी सुधीरदादांनी गेल्या दहा वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास कामांसाठी पैसे आणले आहेत.माजी नगरसेवक युवराज बावडेकर यांनी स्वागत केले. यावेळी माजी नगरसेवक सुबराव मद्रासी, माजी नगरसेविका उर्मिला बेलवलकर, अरविंद भाऊ तांबेकर, शरद नलावडे, शैलेश भाऊ पवार, सुनील पवार, बाळू बेलवलकर, संदीप कुकडे, रोहित जगदाळे, सतीश खंडागळे, राजू जवळेकर, संतोष गोरे, गणपत साळुंखे, संभाजी सूर्यवंशी, मल्हारी तांदळे ,रामचंद्र पवार ,अरविंद खंडागळे ,नरसू खोकडे,विकास हणभर ,युवराज बोंद्रे ,शाखा अभियंता विशाल वाघमोडे ,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अनिल पाटील तसेच या रस्त्याचे ठेकेदार श्री गुंजाटे, राकेश कुकरेजा यांच्यासह मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.फोटो कॅप्शनसांगली: हरिपूर काळीवाट वीर शिवा काशिद चौक ते आदीसागर मंगल कार्यालयाकडे जाणारा रस्ता आणि शास्त्री चौक ते अंकली आदीसागर मंगल कार्याकडे जाणारा रस्ता या कामाचे भूमिपूजन आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते झाले. त्यावेळी शेखर इनामदार, सुबराव मद्रासी, युवराज बावडेकर, शैलेश पवार ,अरविंद तांबवेकर आदी उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.