मकबा हाईट्समध्ये रात्री बैठक अन् माझ्या राजसाहेबांना फसवलं... वांद्रेत मोठी सेटलमेंट? मनसेत खळबळ माजवणारा गौप्यस्फोट
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमधून मनसेत मोठा प्रवेश झाला. भाजप नेत्या आणि माजी आमदार तृप्ती सावंत यांनी राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) पक्षात प्रवेश केला आहे. मनसेमध्ये प्रवेश घेताच राज ठाकरे यांनी
त्यांना वांद्रा पूर्व येथून निवडणुकीत उमेदवारी दिली आहे. मात्र
वांद्र्यात मोठी सेटलमेंट झाल्याचा गौप्यस्फोट समोर आला आहे. मनसे नेते
अखिल चित्रे यांनी माझ्या राजसाहेबांना फसवलं जात असल्याचा आरोप केला असून
मोठा खुलासा केला आहे.
महायुतीत सहभागी असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीने वांद्रा पूर्व मतदारसंघातून सध्याचे आमदार झिशान सिद्दीकी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. झिशान हे प्रसिद्ध राजकारणी बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आहेत. दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने वरुण सरदेसाई यांना उमेदवारी दिली आहे. अशा परिस्थितीत, तृप्ती सावंत यांना या निवडणुकीत दोन दिग्गज प्रतिस्पर्ध्यांची सामना करावा लागणार आहे.अखिल चित्रे तृप्ती सावंत यांच्या उमेदवारीबाबत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, "मी कोणत्याही संदेशावर व्यक्त होणार नव्हतो. मात्र, ज्यांना विधानसभा निवडणुकीची परिस्थिती माहीत नाही, ते देखील व्यक्त होत आहेत." या कार्यकर्त्याने खुलासा करताना सांगितले की, "तृप्ती सावंत यांना उमेदवारी दिली गेली आहे ती फक्त स्वार्थासाठी, मनसेला जिंकवण्याचा हेतू त्यामध्ये नाही."
सेटलमेंट आणि राजकीय भेटीचे गौप्यस्फोट
२८ ऑक्टोबर रोजी रात्री वांद्रा पूर्व येथील मकबा हाईट्स येथे झालेल्या एका बैठकीत झिशान सिद्दीकी यांच्या समर्थनार्थ तृप्ती सावंत यांचा उमेदवारी अर्ज करण्यात आला आहे, असे या चित्रे यांनी म्हटले आहे. "तृप्ती सावंत यांचे हिंदू संघटनांच्या काही कार्यकर्त्यांना वाटते की, त्या मुस्लिम उमेदवाराला हरवण्यासाठी उभ्या आहेत, मात्र त्या तर जिशान सिद्दीकी यांच्या सहकार्याने निवडणूक लढणार आहेत," असा गौप्यस्फोट अखिल चित्रे यांनी केला.
भाजप समर्थकांमध्ये नाराजी
वांद्रा पूर्व येथील काही भाजप समर्थक हिंदू संघटनांच्या सदस्यांनी आपला विरोध व्यक्त केला आहे. त्यांना याबाबत काहीच माहिती नसल्यामुळे त्यांनी विरोधासाठी सागर बंगल्यावरही संपर्क साधला होता. मात्र, त्यांच्या मते तृप्ती सावंत निवडणुकीत झिशान सिद्दीकी यांना अप्रत्यक्ष समर्थन देण्यासाठी उभ्या आहेत.अखिल चित्रे यांचा दावा आहे की राजसाहेबांना फसवले जात आहे, आणि त्यांना याबद्दल जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला असता तो असफल ठरला. "आजकाल अनेकजण स्वतःला 'प्रशांत किशोर' समजतात, आणि मनसेमध्ये आलेल्या त्या मॅडम निवडणुकीत जिंकल्या तरी किंवा हरल्या तरी मनसेमध्ये टिकणार नाहीत."
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.