शरद पवारांच्या उमेदवारांची संभाव्य यादी : बारामतीत तगडा उमेदवार! आंबेगाव, घाटकोपरचाही समावेश
भारतीय जनता पार्टीने रविवारी आपल्या 29 जणांची यादी जाहीर केल्यानंतर आज अजित पवारांच्या पक्षाची पहिला यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. एकीकडे महायुतीमधील घटक पक्षांनी यादी जाहीर केलेली असतानाच विरोधी पक्षात असलेल्या शरद पवारांच्या पक्षाच्या उमेदवारांची पहिली संभाव्य यादी समोर आली आहे.
उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपावरुन टोकाचे मतभेद असल्याने शरद पवार मध्यस्थी करत असतानाच दुसरीकडे त्यांच्या पक्षाची संभाव्य यादी समोर आली आहे. ही 39 संभाव्य उमेदवारांची पहिली यादी हाती लागी आहे.
यादीत कोणाकोणाचा समावेश?
संभाव्य उमेदवारांच्या यादीनुसार 11 विद्यमान आमदारांना शरद पवार गटाकडून पुन्हा संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. तासगावमध्ये दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांच्याऐवजी मुलगा रोहित पाटील यांना उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. संभाव्य उमेदवारांच्या यादीमध्ये अनेक माजी आमदारांचाही समावेश आहे. गेल्या वेळी विधानसभा लढलेल्या काही उमेदवारांचाही समावेश या यादीत आहे.
शरद पवारांच्या पक्षाची संभाव्य उमेदवारांची यादी
1. जयंतराव पाटील - इस्लामपूर2. डॉ. जितेंद्र आव्हाड - कळवा-मुंब्रा3. अनिल देशमुख - काटोल4. राजेश टोपे - घनसावंगी5. बाळासाहेब पाटील - कराड ऊत्तर6. रोहित पवार - कर्जत जामखेड7. प्राजक्त तनपुरे - राहुरी8. रोहित पाटील - तासगाव-कवठे महांकाळ9. सुनील भुसारा - विक्रमगड10. अशोक पवार - शिरूर11. मानसिंग नाईक - शिराळा12. शशिकांत शिंदे - कोरेगाव13. संदीप क्षीरसागर किंवा ज्योती मेटे - बीड14.14. हर्षवर्धन पाटील - इंदापूर15. राखीताई जाधव - घाटकोपर पूर्व16. राजेंद्र शिंगणे - सिंदखेड राजा17. युगेंद्र पवार - बारामती18. समरजीत घाटगे - कागल19. राणी लंके - पारनेर20. रोहिणीताई खडसे - मुक्ताईनगर21. प्रभाकर देशमुख - माण खटाव22. दिलीप खोडपे - जामनेर23. राजीव देशमुख - चाळीसगाव24. अमित भांगरे - अकोले25. प्रतापराव ढाकणे - पाथर्डी26. दिपीकाताई चव्हाण - बागलाण27. प्रशांत जगताप - हडपसर28. सचिन दोडके - खडकवासला29. देवदत्त निकम - आंबेगाव30. उत्तमराव जानकर - माळशिरस31. नंदाताई कुपेकर- बाभूळकर - चंदगड32. पृथ्वीराज साठे/ अंजली घाडगे - केज विधानसभा33. भाग्यश्री आत्राम - अहेरी34.गुलाबराव देवकर आप्पा - जळगाव शहर35. प्रदीप नाईक जाधव - किनवट36. जयप्रकाश दांडेगावकर - वसमत37. बाबजानी दुराणी - पाथरी38. विजय भाबंळे - जिंतूर39. चंद्रकांत दानवे - भोकरदन
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.