आमचं सरकार पुन्हा सत्तेत येऊ दे, ऑर्थर रोड तुरुंगातच टाकतो; नितेश राणे कुणावर भडकले?
भाजप आमदार नितेश राणे आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यातील वाद काही नवा नाही. दोन्ही एकमेकांवर सातत्याने टीकेचा भडिमार करीत असतात. अगदी काल परवाच मुंबई येथे माध्यमांसमोर बोलताना राऊतांनी अत्यंत खालच्या भाषेत राणेंवर टीका केली होती.
त्यांच्या या टीकेचा नितेश राणेंची चांगलाच समाचार घेतला आहे. इतकंच नाही, तर त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर देखील टीकेचा प्रहार केला. आमदार नितेश राणे यांनी आज रविवारी (ता. ६) सिंदुदुर्ग येथे पत्रकारपरिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला. नितेश राणे म्हणाले, "शनिवारी संजय राऊत यांनी मला शिवी घातली. त्यांना मी सांगेल की एका बापाची औलाद असेल तर माझ्यासमोर येऊन बोला. तेव्हा तुमच्या तंगड्या तोडून हातात देईल".
तुम्ही आम्हाला शिव्या घातल्या तर आम्ही गप्प बसू का? लक्षात ठेवा आम्ही पण बाळासाहेबांच्या तालिमीत तयार झालेले शिवसैनिक होतो. आम्ही दलाली करून अजिबात मोठे झालेलो नाही, अशी जहरी टीका नितेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर केली. पुढे बोलताना राणे म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुठे जावं कुठे प्रचार करावा हे तुम्ही शिकवण्याची गरज नाही.
"तुमचे मालक (उद्धव ठाकरे) मुख्यमंत्री होते तेव्हा मेट्रो प्रकल्पाचे श्रेय देवेंद्र फडणवीस यांना मिळू नये म्हणून त्यांनी या प्रकल्पाला स्थगिती देण्याचे काम केले. भाजपने आणलेल्या प्रकल्पांना चालना मिळत असेल तर तुमच्यासारख्या पाकिस्थानी व्यक्तींना राग येणं साहजिकच आहे. महाराष्ट्राचा विकास होत असेल, तर यांना असंच झोंबणार", असा टोलाही नितेश राणे यांनी संजय राऊतांना लगावला.
"आमचं सरकार आलं की तुला जेलमध्ये टाकणार"
विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात आमचं सरकार येणार आणि ते सरकार आलं की तुमच्यासारख्या 420 चोरांना ऑर्थर रोड जेलमध्ये टाकणार. त्यावेळी तुम्ही आणि तुमचे मालक शेमड्या मुलासारखे आमच्या नेत्यांच्या घरासमोर येऊन लोळू नका, असा धमकीवजा इशाराही आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतांना दिला.आदित्य ठाकरे यांच्यावर बोलताना राणे म्हणाले, अंमली पदार्थाची चिंता संजय राऊतांनी करू नये. कारण, अंमली पदार्थांचा बादशाह मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर झोपतो. आदित्य ठाकरे यांची रक्तचाचणी करावी, त्यांच्या रक्तात नक्कीच घटक आढळून येतील, अशी टीकाही देखील आमदार नितेश राणे यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.