पिगमेंटेशनमुळे चारचौघात तोंड दाखवायची लाज वाटतेय? आजपासूनच हा उपाय सुरू करा
पिगमेंटेशनचा त्रास पूर्वी वयाची ५० शी ओलांडलेल्या व्यक्तींना व्हायचा. शरीरात कॅल्शीअमची कमी, व्हिटॅमीन आणि अन्य काही गोष्टींमुळे चेहऱ्यावर त्वचेवर काळे डाग येतात. त्यालाच पिगमेंटेशन म्हणतात. मात्र आताची जीवनशैली बदलली आहे.
प्रदूषण सुद्धा मोठ्याप्रमाणात वाढलं आहे. त्यामुळे सध्या पिगमेंटेशनचा
त्रास अगदी तरुण वयातील मुला मुलींना सुद्धा होत आहे.
पिगमेंटेशनपासून स्वताची सुटका व्हावी म्हणून मुलं मुली विविध कॉस्मेटीक्स क्रिम चेहऱ्यावर अप्लाय करतात. काहींना या क्रिम सुट होतात तर काहींना याचा आणखी जास्त त्रास होतो. स्किन आधीपेक्षा जास्त खराब होते. त्यामुळेच आज या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही रामबाण आणि घरगुती उपाय सांगणार आहोत.
बटाट्याचा रस
पिगमेंटेशनवर बटाटा लावताना सर्वात आधी बटाट बारीक किसून घ्या. किसल्यानंतर एक मलमलचे कापड घ्या. त्यात बटाटा भरून त्यातून रस काढा. हा रस थेट जेथे पिगमेंटेशन आहे तेथे अप्लाय करा. चेहरा सुकला की स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. ही प्रोसेस आठवड्यातून किमान ३ ते ४ वेळा केली पाहिजे.
तुळशीच्या पानांचा रस
सर्वात आधी तुळशीची मोठी पाने घ्या. तुळशीची पाने छान धुवून घ्या. पाने धुवून घेतल्यावर ती मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. या पेस्टमध्ये पुढे थोडा लिंबाचा रस सुद्धा मिक्स करा. लिंबाचा रस मिक्स केल्यावर ही पेस्ट चेहऱ्यावर अप्लाय करा. तुळशीची पाने तुमच्या चेहऱ्यावरील पिगमेंटेशन दूर करते.
लिंबाचा वापर
पिगमेंटेशन जाण्यासाठी तुम्ही आणखी एक रामबाण उपाय करू शकता. त्यासाठी लिंबू रस त्यात बदामाचेत तेल आणि मध मिक्स करा. त्यानंतर ही पेस्ट चेहऱ्याला लावून १० मिनिटे चेहऱ्यावर मसाज करा. तुम्ही लिंबाचा रस आणि दूध एकत्र करून देखील चेहऱ्यावर अप्लाय करू शकता.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा सांगली दर्पण करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.