अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड यांचा भ्रष्टाचाराचा नवा रेकॉर्ड
मुंबई : खरंतर लोकसेवक अर्थात वरिष्ठ अधिकार्यांनी लोकभिमुख निर्णय घेणे अपेक्षित असते. मात्र वरिष्ठ पदावर असतांना जनतेशी बांधीलकी सोडून केवळ जितके ओरबाडून खाता येईल, तितके खावे असाच नवा पायंडा अधीक्षक अभियंता श्रीमती सुषमा गायकवाड यांनी सार्वजनिक बांधकाम मंडळ रायगडमध्ये पाडल्याचे दिसून येत आहे.
श्रीमती सुषमा गायकवाड यांना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा कृपाशिर्वाद असल्यामुळे त्यांच्या कारकीर्दीमध्ये भ्रष्टाचाराचे उंच टोक गाठले आहे. त्याचबरोबर श्रीमती वाघमारे यांचा पनवेल, महाड आणि अलीबाग येथील कार्यकारी अभियंता श्रीमती रूपाली पाटील, जगदीश सुखदेवे आणि नामदे यांना असलेल्या कृपाशीर्वादामुळे अळी मिळी गुप चिळी प्रमाणे कोट्यावधींचा मलिदा लाटण्याचे काम सध्या सुरू आहे.
याविषयी सविस्तर वृत्त असे की, पनवेल, महाड आणि अलीबाग या तीन विभागामध्ये कामे न करता अनेक देयकांची लूट करण्यात आली आहे. देखभाल दुरूस्तीच्या कामांमध्ये मोठा गैरव्यवहार केल्याचे दिसून येत आहे. यासोबतच अनेक कामे जी ओरिजनक करण्यात आली आहेत, त्यामध्ये सेविंग करण्यात आले आहे. मटेरिअल सेविंग करण्यात आले आहे. नियमबाह्य कामांना या तीन विभागात मोठ्या प्रमाणात प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच या तीनही विभागातील कार्यकारी अभियंता यांनी या कामांची कुठलीही चेकिंग न दाखवता सर्व बाबी या टेबलावर टक्केवारी घेवून केल्याचे दिसून येत आहे.
प्रधान सचिव म्हैसकर याकडे लक्ष देतील का ?
सार्वजनिक बांधकाम मंडळ रायगड विभागात सर्व खोट्या नोंदी करून, बोगस कामे दाखवून ही बिले काढण्यात येत आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला असून, कोट्यावधींची उलाढाल झाल्याचे दिसून येत आहे. परिणामी शासनाचा आणि सर्वसामान्यांच्या कष्टाच्या पैशांचा अक्षरक्षः चुराडा अधीक्षक अभियंता श्रीमती सुषमा गायकवाड यांनी चालवला आहे. त्यांच्या या महाघोटाळ्यात पनवेल, महाड आणि अलीबाग येथील कार्यकारी अभियंता श्रीमती रूपाली पाटील, जगदीश सुखदेवे आणि नामदे यांचे अर्थपूर्ण सहकार्य असल्यामुळे या विभागाने भ्रष्टाचाराचा नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. त्यामुळे या संपूर्ण भ्रष्टाचाराची प्रधान सचिव मनीषा म्हैसकर या लक्ष देवून चौकशी करतील का ? असा सवाल उपस्थित होत आहे.
सा.बां. सचिव साळुंखे आणि दशपुते लक्ष देतील का ?
सार्वजनिक बांधकाम विभागात पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचा नवा उच्चांक प्रस्थापित केला असतांना वरिष्ठ अधिकारी नेमके करतात काय? असा सवाल उपस्थित होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव स.दा. साळुंखे आणि संजय दशपुते यांच्याकडे पनवेल, महाड आणि अलीबाग या सर्वाजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता श्रीमती रूपाली पाटील, जगदीश सुखदेवे आणि नामदे यांनी नियमबाह्य कामांचा धडाका लावल्याच्या तक्रारी प्राप्त होवून देखील त्याची चौकशी करण्याचे धाडस अधिकारी का दाखवत नाही? असा सवाल उपस्थित होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.