Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील बँक कर्मचारी १६ नोव्हेंबरला संपावर

लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील बँक कर्मचारी १६ नोव्हेंबरला संपावर

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीमुळे बँकांमध्ये तुफान गर्दी होत आहे. यामुळे बँक कर्मचाऱ्यांना काम करताना असुरक्षित आणि भितीचे वातावरण निर्माण होत आहे.

दरम्यान कामाच्या ठिकाणी सरकारकडून पुरेशी सुरक्षा मिळावी या मागणीसाठी महाराष्ट्रातील बँक कर्मचारी १६ नोव्हेंबरला संपावर जाणार आहेत, अशी माहिती बँक कर्मचारी संघटनेने दिल्याचे वृत्त 'टाईम्स ऑफ इंडिया'ने दिले आहे. 

या योजनेमुळे बँकांमध्ये महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. दरम्यान मारामारीच्या हिंसक घटना देखील घडत आहेत. बँकांमध्ये काम करणे असुरक्षित झाले आहे. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे राज्यातील बँक कर्मचारी शनिवार दि.१६ नोव्हेंबर रोजी संपावर जाणार आहेत. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (UFBU) हा संप पुकारला आहे. UFBU ही नऊ बँक युनियनची संघटना असल्याचेही वृत्तात म्हटले आहे.

राज्याच्या विविध भागात योजनेचे लाभार्थी आणि स्थानिक नेत्यांकडून बँक कर्मचाऱ्यांसोबत गैरवर्तन, शिवीगाळ आणि मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळेच आम्ही एकदिवसीय संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. योजनेच्या योग्य अंमलबजावणीसाठी सरकारने बँकांना पुरेशी सुरक्षा आणि अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणीही यूएफबीयूचे राज्य संयोजक देविदास तुळजापूरकर यांनी दिली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.