मुंबईत रिक्षा चालक अन् कार चालकामध्ये वाद; भररस्त्यात बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू
मुंबईतील मालाड पूर्वेकडील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्याच्या मुलाची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात मनसेकडून सवाल उपस्थित केले जात आहेत.
मालाड पूर्वेकडील दिंडोशी भागात मनसे कार्यकर्त्याचा मुलगा आकाश माईन (27) याची रिक्षाचालक आणि स्थानिक विक्रेत्यांनी केलेल्या मॉब लिंचिंगमध्ये त्याचा मृत्यू झाला.
ही घटना शनिवारी घडली. माईन दसऱ्याच्या निमित्ताने नवी कार खरेदी करण्यासाठी निघाले होते. मालाड रेल्वे स्टेशनजवळ एका रिक्षेने त्यांच्या कारला ओव्हरटेक केलं. ज्यानंतर रिक्षा चालक आणि माईन यांच्यात वाद झाला. पाहता पाहता हा किरकोळ वाद वाढला आणि रिक्षा चालकांनी आपले मित्र, स्थानिक विक्रेत्यांसोबत मिळून मनसे कार्यकर्त्याच्या मुलावर हल्ला केला.
मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करीत होती आई...
जमावाने आकाश माईनला अत्यंत वाईट पद्धतीने मारहाण केली. ज्यात तो जखमी झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून कोणालाही धक्का बसेल. व्हिडिओमध्ये माईन यांची आई मुलाला वाचविण्याचा प्रयत्न करीत होती. मात्र हल्लेखोर मुलासह त्याच्या वडिलांनाही मारहाण करीत असल्याचं दिसतं. वडील हल्लेखोरांकडे हात जोडून माफी मागत आहेत.
पोलिसांनी 9 जणांना केली अटक
हल्लेखोर आकाशला मारहाण करीत होते, त्यावेळी त्याचे आई-वडील मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र हल्लेखोर आकाशच्या वडिलांनाही मारहाण करीत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. आरोपी ऑटो रिक्षा चालक आणि अन्य तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 12 ऑक्टोबर रोजी घडली असून ज्यात पोलिसांनी 9 जणांना अटक केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.