दिवाळीची साफसफाई करण्याआधी झाडूवर चप्पल मारा; चकीत करणारा परिणाम
झाडूवर मारा चप्पल... वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण झाडूवर चप्पल मारण्याचा खूप मोठा फायदा असा. यामुळे तुमची एका समस्येतून कायमची सुटका होईल. एक झंझट कायमची संपून जाईल.
एका गृहिणीने हा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. झाडू आपण कचरा काढून स्वच्छता करण्यासाठी करतो. तर चप्पल आपण पायात घालतो, जेणेकरून आपल्या पायाला कचरा, धूळ, माती, घाण किंवा आणखी काही लागू नये. तशा झाडू आणि चप्पल दोन्ही गोष्टी स्वच्छतेसाठी पण याचा एकत्र वापर होऊ शकतो याचा आपण विचारही कधी केला नव्हता. पण एका गृहिणीने ते केलं.
आता झाडूवर चप्पल मारल्याने नेमकं काय होतं, कोणत्या समस्येतून सुटका होते, कोणती झंझट संपते हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल. चला तर मग पाहुयात झाडूवर चप्पल मारल्याने होतं काय. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता महिला एका पिशवीतून झाडू काढते. तिनं नवीनच झाडू आणली आहे. या झाडूवर ती चप्पलेने मारते. झाडूच्या झुपक्यावर ज्याने आपण केर काढतो तिथं संपूर्ण ती हलक्या हाताने चपलेने मारताना दिसते. आता याचा फायदा काय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
तुम्हाला माहिती असेल नवीन झाडू आणल्यानंतर सर्वात मोठी समस्या असते ते त्यातून पडणारा डस्ट. कचरा करण्यासाठी आपण जी झाडू वापरतो त्याच झाडूच्या या डस्टमुळे कचरा होतो. किती तरी दिवस ही डस्ट झाडूतून पडते. त्यामुळे कचरा काढला तरी कचरा होतोच. याच समस्येवर हा उपाय आहे.झाडूवर चप्पल मारल्याने त्यातील जितका डस्ट आहे, तितका सर्व बाहेर पडतो. पुन्हा नंतर जेव्हा तुम्ही झाडू माराल तेव्हा यातील डस्ट बिलकुल येणार नाही. एकदाच चप्पल मारल्यानंतर तुमची ही समस्या कायमची दूर होईल. अगदी कमीत कमी वेळात जास्तीत जास्त डस्ट झाडूतून बाहेर पडेल. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता महिलेने झाडूवर चप्पल मारल्यानंतर त्यातून किती डस्ट बाहेर पडला आहे. जर हा डस्ट तिनं एकाच वेळी अशा पद्धतीने काढला नसता तर तो दररोज पडत राहिला असता.
(सूचना - हा लेख सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. सांगली दर्पण याच्याशी काहीही संबंध नाही. सांगली दर्पण याची हमी देत नाही.)
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.