Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मंत्री तानाजी सावंत यांच्या सुरक्षा रक्षकाची रिव्हॉल्व्हर खाली कोसळली, गोळी एकाच्या पायाच्या आरपार गेली

मंत्री तानाजी सावंत यांच्या सुरक्षा रक्षकाची रिव्हॉल्व्हर खाली कोसळली, गोळी एकाच्या पायाच्या आरपार गेली


पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे नेते आणि सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांच्या बंगल्यावर काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकाच्या घरी एक धक्कादायक घटना घडली आहे.

खाजगी सुरक्षा रक्षकाने कपाटात ठेवलेल्या रिव्हॉल्व्हरला धक्का लागल्याने घरातच गोळीबार झाला. या गोळीबारात त्यांचा 13 वर्षीय शाळकरी मुलगा जखमी झाला आहे.

पुण्यातील धनकवडीतील वनराई कॉलनी भागात ही घटना घडली आहे. मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे निवृत्त जवान नितीन हनुमंत शिर्के हे खाजगी सुरक्षा रक्षक म्हणून काम करत आहेत. याप्रकरणी नितीन हनुमंत शिर्के यांच्याविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

मिळालेल्या माहितीनुसार, शिर्के लष्करातून निवृत्त झाले असून ते सध्या सुरक्षा अधिकारी म्हणून काम करतात. मंत्री तानाजी सावंत यांच्या बंगल्यावर ते कार्यरत आहेत. शिर्के यांच्याकडे शस्त्र परवाना आहे. त्यांनी रिव्हॉल्व्हर कपाटातील एका पिशवीत ठेवली होती. रिव्हॉल्व्हरमध्ये गोळ्या भरलेल्या होत्या. त्यांच्या मुलाने मंगळवारी दुपारी कपाट उघडले आणि त्याचा रिव्हॉल्व्हर ठेवलेल्या पिशवीला धक्का लागला. पिशवी जमिनीवर पडली आणि रिव्हॉल्व्हरचा चापावर दाब पडला आणि गोळीबार झाला. रिव्हॉल्व्हरमधून सुटलेली एक गोळी त्याच्या पायातून आरपार गेली आहे. अभय शिर्केअसं जखमी झालेल्या मुलाचं नाव आहे.


मुलाला तातडीने नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रुग्णालयातून याची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली. घराची पाहणी केली आहे. याप्रकरणी नितीन हनुमंत शिर्के यांच्याविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.