Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुंबईत चाललंय काय? पँटवर सू केल्यामुळे नराधमाने प्रेयसीच्या ४ वर्षीय मुलाचा घेतला जीव

मुंबईत चाललंय काय? पँटवर सू केल्यामुळे नराधमाने प्रेयसीच्या ४ वर्षीय मुलाचा घेतला जीव
 

मुंबई : कुर्ला येथे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पँटवर सू केली म्हणून ४ वर्षीय चिमुरड्याला बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. मारहाणीत ओमकार चंद्रवंशी नावाच्या मुलाचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्रियकर रितेशकुमार अजय चंद्रवंशी (वय १९) याच्या विरोधात नेहरू नगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंद दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

पँटमध्ये सूसू केली म्हणून ओमकारच्या आईच्या प्रियकराने मुलांना मारहाण केली. पोटात लाथा घातल्याने चिमुरड्याला रुग्णालयात भरती करावे लागले. उपचारादरम्यान ओमकारचा सायन रुग्णालयात मृत्यू झाला.  १९ वर्षीय रितेशकुमार अजय चंद्रवंशी आपल्या प्रेयसी सोबत कुर्ला ईस्टमध्ये पत्रा चाळमध्ये राहत होता. रितेशकुमारची प्रेयसी आपल्या पतीपासून वेगळी राहत होती. तिला ६ वर्षाची मुलगी आणि ४ वर्षाचा मुलगा होता. महिला पटना मध्ये आपल्या मुलांसोबत राहत होती. तिथेच दोघांची भेट झाली. यानंतर दोघांनी सोबत राहण्याचे ठरवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आधी महिला व रितेशकुमार यांच्यात मैत्री झाली होती. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर महिला आपल्या मुलांना घेऊन रितेशसोबत मुंबईत आली.

२६ ऑक्टोबरला सदर महिला मुलांना रितेशजवळ ठेवून कामावर गेली. यावेळी मुलाने रितेशच्या पँटवर लघवी केली. यामुळे रितेश संतापला त्याने मुलाला अत्यंत क्रूरपणे मारहाण केली. रितेशने मुलाच्या पोटावर लाथ मारली.  कामावरुन आई घरी आली तेव्हा मुलांनी आईला झालेला प्रकार सांगितला. आईने मुलाला रुग्णालयात नेले. मुलावर प्राथमिक उपचार करुन घरी आणले.

मृत्यू कसा झाला?

महिलेने या प्रकरणी रितेशला जाब विचारला तर तो काही न सांगता घरातून निघून गेला. मुलाने औषध घेतल्यानंतर त्याच्या पोटात त्रास व्हायला लागला. यामुळे महिलेने मुलाला राजावाडी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याला सायन रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. मात्र रविवारी मुलाचा मृत्यू झाला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.