Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली, मिरजेतून दुचाकी चोरणाऱ्या दोघांना अटक, तीन गुन्हे उघडप पावणेदोन लाखांच्या दुचाकी जप्त, सांगली एलसीबीची कारवाई

सांगली, मिरजेतून दुचाकी चोरणाऱ्या दोघांना अटक, तीन 
गुन्हे उघड
पावणेदोन लाखांच्या दुचाकी जप्त, सांगली एलसीबीची कारवाई

सांगली : 

सांगली, मिरजेतून दुचाकी चोरणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आणत पावणेदोन लाख रूपयांच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली. 

गौरव सुंदर भाले (वय २१, रा. भारतनगर, मिरज), सुशांत सुनील चंदनशिवे (वय २६, रा. चिंतामणीनगर, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मिरजेतील लोंढनगरमधील सागर पंजवाणी यांनी त्यांची दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानंतर निरीक्षक शिंदे यांनी यातील चोरट्यांना पकडण्यासाठी सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे एक पथक तयार केले होते. 

पथकाला भाले याने त्याच्या घराजवळ चोरीच्या दुचाकी लपवल्याची माहिती मिळाली. पथकाने तेथे छापा टाकला. त्यावेळी भाले याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली. त्यावेळी त्याने चंदनशिवे याच्या साथीने सांगली आणि मिरजेतून तीन दुचाकी चोरल्याची कबुली दिली. चंदनशिवे यालाही नंतर ताब्यात घेऊन तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्यांच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. दोघांनाही विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक पंकज पवार, सागर लवटे, गुंडोपंत दोरकर, विक्रम खोत, अमर नरळे, संदीप नलवडे, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.