सांगली ः सांगलीवाडी महापालिका क्षेत्राचा भाग असली तरी तिचे स्वतंत्र अस्तित्व आहे. कृष्णाकाठच्या या गावाची रग वेगळी आहे. या गावाच्या विकासाला मी सतत बळ देईन. इथली चिंचबाग, कबड्डीचं आणि होड्यांच्या शर्यतीचं वेड न्यारं आहे. इथली शेती प्रगत आहे. इथल्या तरुणांना आधुनिक सुविधा देण्यासाठी मी पूर्ण क्षमतेने काम करेन, अशी ग्वाही सांगली विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनी दिली.
सांगलीवाडी येथे त्यांनी प्रचार दौरा केला. वाडीत घरोघरी भेटी दिल्या. लोकांशी संवाद साधला. लोकांनी आपल्या अपेक्षा मांडला. श्री. पाटील यांनी त्या पूर्ण करण्याचा त्यांचा आराखडा लोकांसमोर ठेवला. सांगली मतदार संघाच्या विकासाचे व्हिजन घेऊन, त्याचा संपूर्ण आराखडा घेऊन मी दहा वर्षे काम करतोय. त्याची दखल गेल्या निवडणूकीत ८७ हजार लोकांनी घेतली. यावेळी काँग्रेसने पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास साधवला. आमदार विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील यांचे बळ माझ्यासोबत आहे. नाराज जयश्रीताईंची नाराजी दूर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले, की गेली पंधरा वर्षे सांगलीत कॉंग्रेसचा आमदार नाही. बालेकिल्ला कसा म्हणायचा? आपण पुन्हा एकदा ताकदीने उभे राहू. विकासाला साथ देऊ. सांगली आणि जिल्ह्यात कॉंग्रेस एकसंध आहे, महाविकास आघाडी एकसंध आहे. सामान्य माणसांच्या रोजच्या जगण्याची मला कल्पना आहे. मी एसीत बसून, दुपारी वामकुक्षी घेऊन कार्पोरेट पद्धतीने राजकारण करणारा माणूस नाही. माझी परंपरा समाजसेवेची, सहकाराची आहे. माणूस उभा करण्याचे काम काँग्रेसने केले आहे. समाज एकजूट ठेवण्याची परंपरा जपली आहे. तेच आपणाला करायचे आहे. मायमाऊलींच्या विकासाची शाश्वत दिशा ठरवण्यासाठी बचत गटांना बळ देणे गरजेचे आहे. त्यांना त्यांच्या गावात, घरात रोजगाराच्या संधी देण्याचा आमचा संकल्प आहे. महिला सुरक्षा, शहरातील महिला स्वच्छतागृह यासाठी मी आग्रही व आक्रमक भूमिका घेतली आहे.यावेळी दिलीप पाटील, महाबळेश्वर चौगुले, हरीदास पाटील, सच्चीदानंद कदम, उमेश पाटील, आनंदराव पाटील, पी. आर. पाटील, इकबाल तांबोळी, शाहीर पाटील, अभिजित कोळी, मदन पाटील, विष्णू पाटील, हरीदास पाटील, तानाजी व अमृता चोपडे, रामचंद्र पाटील, छायाताई पाटील, दळवी गुरूजी, कमल गोरे, सय्यद मुलाणी, प्रकाश सुर्यवंशी, युवराज पाटील, दिलीप यादव, शंकर दळवी, अशोक गोटखिंडे, विष्णुपंत पाटील, जनार्दन पाटील, अमोल गोटखिंडे, शांताबाई कदम, वसंत पाटील, लक्ष्मण भोसले उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.