Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राहुल गांधींनी हरियाणात एका झटक्यात निवडणुकीचं वारं फिरवलं; 'या' कृतीतून काँग्रेसला सुखद धक्का

राहुल गांधींनी हरियाणात एका झटक्यात निवडणुकीचं वारं फिरवलं; 'या' कृतीतून काँग्रेसला सुखद धक्का
 

हरियाणामध्ये निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसमधील गटबाजी उफाळून आली होती. माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुडा आणि खासदार कुमारी शैलजा यांच्यामधील संघर्षाचा पक्षाला मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात होती.

पण पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या भर सभेतील कृतीमुळे निवडणुकीचे वारे फिरवल्याची चर्चा सुरू झाली आहे.
राहुल गांधी यांची सोमवारी अंबाला येथे प्रचारसभा झाली. पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधीही उपस्थित होते. सभेदरम्यान व्यासपीठावर राहुल यांच्या एका बाजुला हुडा आणि दुसऱ्या बाजुला शैलजा कुमारी होत्या. सभेला उपस्थित मतदारांना हात उंचावून अभिवादन करताना राहुल यांनी तत्परता दाखवली.

कुमारी शैलजा आणि हुडा यांच्या नकळत त्या दोघांचे हात पकडून मिळवले. दोघांचे हात धरत त्यांनी पक्षातील गटबाजी संपुष्टात आल्याचा संदेश उपस्थितांसह हरियाणा काँग्रेसलाही देण्याचा प्रयत्न केला. हरियाणा काँग्रेसकडूनही सोशल मीडियातून हा व्हिडिओ व्हायरल केला जात आहे. याचा निश्चितपणे निवडणुकीत काँग्रेससाठी सकारात्मक परिणाम होईल, अशा आशा नेत्यांना आहे.

शैलजा यांची नाराजी दूर?
उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर कुमारी शैलजा यांनी प्रचारातून माघार घेत दिल्ली गाठली होती. जवळपास 10-12 दिवस त्या प्रचारापासून लांब राहिल्याने पक्षातील गटबाजी उघड झाली. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी त्यांना पक्षात येण्याचे आमंत्रण दिले. पण त्यांनी काँग्रेस सोडणार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, हे सांगताना त्यांनी हुडा यांच्याविषयीची आपली नाराजी जाहीरपणे सांगितली होती.

हरियाणामध्ये 20 ते 22 टक्के दलित मतदार आहेत. शैलजा कुमारी या दलित नेत्या असल्याने त्यांची नाराजी काँग्रेसला परवडणारी नव्हती. त्यामुळे त्यांना काही दिवसांपूर्वीच प्रचारात पुन्हा सक्रीय करण्यात आले. आता मतदानासाठी केवळ चारच दिवस उरलेले असल्याने प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. अशावेळी राहुल यांनी पक्षातील नेत्यांमध्ये एकजुटता दाखविण्याची संधी सोमवारी साधली. आता याचा पक्षाला निवडणुकीत किती फायदा होणार, हे 8 ऑक्टोबरला स्पष्ट होईल.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.