महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात आज पासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. पहाटेच नऊ दिवसांची मंचकी निद्रा संपून देवी सिंहासनावर विराजमान झाली आहे.
घटस्थापनेनंतर नऊ दिवस विविध धार्मिक विधी मंदिरात होतील यामध्ये देवीच्या विविध अलंकार पूजेसह रोज रात्री छबिना निघणार आहे. आई राजा उदो उदो च्या निनादात देवी तुळजाभवानी देवी सिंहासनावर विराजमान झाली आहे. नवरात्र उत्सवामुळे तुळजापूर नगरी भाविकांनी फुलून गेल्याचे चित्र आहे. राज्यासह देशभरातील लाखो भाविक तुळजापुरात दाखल होत आहेत.
भाविकांची गैरसोय होऊ नये याकरिता तुळजाभवानी मंदिर संस्थान कडून देखील जयत तयारी करण्यात आली आहे. पावसात भाविकांची गैरसोय होवू नये यासाठी उभारण्यात आलेला मंडप, विद्युत रोषणाई, महाद्वारावर देवीच्या विविध रूपांचे दर्शन घडविणारी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.