उत्पन्नापेक्षा कोट्यवधींचा मालमत्ता बाळगणार्या शिरीष यादव याच्यावर गुन्हा दाखल; लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
ज्ञात उत्पन्नापेक्षा कोट्यवधीची मालमत्ता बाळगल्याप्रकरणी झोपडपट्टी पुनर्वसन विभागाचे
तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष यादव यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
पुणे महापालिकेत उपायुक्त असताना कोथरुड टीडीआर प्रकरणात शिरीष यादव याच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. शिरीष रामचंद्र यादव यांच्याबरोबरच त्यांची पत्नी प्रतिक्षा शिरीष यादव यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. तब्बल ज्ञात उत्पन्नापेक्षा एक कोटी ३८ लाख ७४ हजार ४४ रुपयांची अपसंपदा बाळगल्याचे चौकशीत आढळून आले आहे.
याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अपर पोलीस अधीक्षक डॉ. शितल जानवे/खराडे यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शिरीष यादव हे झोपडपट्टी पुनर्वसन कार्यालयात उपमुख्य कार्यकारी अधिकारी असताना त्यांच्या संपत्तीबाबत चौकशी सुरु झाली होती.
या परिक्षण कालावधीत संपादीत केलेल्या अपसंपदेबाबत पुरेशी व वाजवी संधी देऊनही ते समाधानकाररित्या स्पष्टीकरण / हिशोब देऊ शकले नाहीत. तसेच त्यांनी संपादित केलेली मालमत्ता त्यांच्या ज्ञात स्त्रोताच्या उत्पन्नाच्या प्रमाणाशी विसंगत असल्याने शिरीष यादव यांनी त्यांच्या उत्पन्नाच्या (२०.३४ टक्के) १ कोटी ३८ लाख ७४ हजार ४४ रुपये इतकी मालमत्ता भ्रष्ट मार्गाने धारण केली असल्याने आढळून आले. त्याला पत्नी प्रतिक्षा यादव यांनी प्रोत्साहन दिले असल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपअधीक्षक अनिल कटके तपास करीत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.