ब्रेकिंग न्यूज! सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या गाडीला अपघात...
गाडी लाईटच्या खांबाला धडकली. आयुक्तांच्या डोक्याला दुखापत.मिरज रोडवरील समर्थ ट्रामा हॉस्पिटलमध्ये आयुक्त उपचारासाठी दाखल...
सांगली - मिरज आणि कुपवाड महापालिका हद्दीत मोकाट कुत्री - गाढव आणि मोकाट जनावरे यांच्यामुळे हा अपघात झाला असल्याची प्रत्येक्ष्यदर्शनी नागरिकांनी सांगितले. अशी मोकाट जनावरे महापालिका क्षेत्रात प्रचंड प्रमाणात आहेत, आयुक्तानी लक्ष देण्याची अनेक संघटनाची मागणी होत आहे, हा तर......या अपघातात आयुक्त शुभम गुप्ता यांना डोक्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शुभम गुप्ता यांच्यावर मिरज येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सांगली शहरातील स्फूर्ती चौक येथे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या गाडीच्या समोर अचानक कुत्रे आडवे आले. त्यामुळे त्यांनी तातडीने ब्रेक मारला आणि गाडी दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांची गाडी खांब्याला धडकली. या घटनेत शुभम गुप्ता यांच्या डोक्याला दुखापत झाली.
संबंधित घटना घडल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील नागरीक शुभम गुप्ता यांच्या मदतीसाठी धावले. त्यांनी शुभम गुप्ता यांना गाडीतून बाहेर काढलं. तसेच अपघातग्रस्त गाडी बाजूला केली. त्या गाडीला रस्त्याच्या कडेला बाजूला लावण्यात आलं आणि शुभम गुप्ता यांना दुखापत झाल्यामुळे त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.