Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याने विवाहितेचा गर्भपातसांगलीतील घटना : पतीसह चौघांवर गुन्हा दाखल

लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याने विवाहितेचा गर्भपात सांगलीतील घटना : पतीसह चौघांवर गुन्हा दाखल
 

सांगली :  लग्नात मानपान केला नाही म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. पतीने पोटावर बुक्की मारली. सासरच्या मंडळींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात विवाहितेचा गर्भपात झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तेहसिन जुनेद तांबोळी (वय २५, सध्या रा. कसबे डिग्रज, ता. मिरज) या विवाहितेच्या तक्रारीनुसार शहर पोलिसांनी पतीसह चारजणांवर गुन्हा दाखल केला आहे. पती जुनेद मुसा तांबोळी (वय ३०), दुल्हन मुसा तांबोळी (वय ४५), मुसा महमंदगौस तांबोळी (५२) व तबस्सुम मुसा तांबोळी (३६, सर्व रा. शामरावनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तेहसिन व जुनेद यांचा विवाह झाला होता. लग्नात तेहसिनच्या आई-वडिलांनी मानपान केला नाही, असे म्हणत माहेरहून एक लाख रुपये घेऊन ये, नाही तर त्या किमतीचे सोने घेऊन ये, असा तगादा संशयितांनी लावला होता. त्यासाठी तेहसिनचा मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला. या कालावधीत तेहसिन गर्भवती होती. 'हे मूल नको' म्हणून गर्भपात करण्यासाठीही संशयितांनी तिच्यावर दबाव टाकला. तिच्या पोटावर जोराची बुक्की मारली. या छळाला कंटाळून तेहसिन माहेरी आली. संशयित चौघांनीही माहेरी येऊन तेहसिन व तिच्या आईला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. हे चौघे तिचा गर्भपात करण्यास कारणीभूत ठरल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.