पुणे :-रोज एकाला पाठवून सॉफ्टवेअर इंजिनिअर पत्नीवर अत्याचार, व्हिडीओ शुटिंगही केले; उच्चशिक्षित नवऱ्याच्या कृत्याने पिंपरी हादरली
राज्यात महिलांविरोधातील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. कधी शाळेतील सफाई कर्मचाऱ्यांकडून मुलींवर, तर कधी बसचालकाकडून अत्याचार, अशा अनेक घटना गेल्या काही दिवसांत कानावर येत आहेत.
हे तर बाहेरचे लोक झाले, पण पिंपरी चिंचवडमध्ये तर एका महिलेचा तिच्या नवऱ्यानेच विश्वासघआत करत तिला भयंकर त्रास दिला. पिंपरी-चिंचडवडमध्ये एक भयानक घटना घडली आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या पत्नीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पतीसह चार जणाविरोधात रावेत पोलिसांनी लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला आहे. पुनावळे परिसरात राहणाऱ्या एका विवाहीत महिलेने रावेत पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला सॉफ्टवेअर इंजिनिअर ( 30 वर्ष) असून ती विवाहीत आहे. ती पतीसह पुनावळे परिसरात राहते.महत्वाची गोष्ट म्हणजे पीडित महिलेसह तिचा पती आणि सर्व आरोपी उच्चशिक्षित असून एका मोठ्या कंपनीत काम करतात. पीडित महिलेवर तिघांनी वेगवेगळ्या दिवशी लैंगिक अत्याचार केला, धक्कादायक गोष्ट म्हणजे तिच्या पतीनेच त्या तिघांकडून आपल्या पत्नीवर लैंगिक अत्याचार करवून घेतला. घृणास्पद गोष्ट म्हणजे त्याने या संपूर्ण अत्याचाराच्या क्षणांचे व्हिडीओ शूटिंग मोबाईलमध्ये केलं, असा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे.
त्यानंतरही तिच्या पतीला दया आली नाही, उलट त्याने त्याच्या पत्नीला हे अत्याचाराचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली आणि त्यानंतर पत्नीसोबत अनैसर्गिक कृत्यही केलं. सप्टेंबर 2023 ते 6 एप्रिल 2024 या आठ महिन्यांच्या कालावधीत पीडितेसोबत हा सर्व प्रकार घडला. त्या महिलेने पतीला विरोध केला असता, त्याने तिला शिवीगाळही केली. पती-पत्नीमध्ये बरेच वाद सुरू आहेत. अखेर त्या महिलेने रावेत पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत घडलेला सर्व प्रकार कथन केला आणि पती व त्या तिघांविरोधात तक्रार दाखल केली. त्या महिलेच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी तिच्या पतीसह एकूण चार जणांविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.