सुधीरदादा यांच्या विजयाची हॅट्रिक करा मी सांगलीला विकासाकडे नेणारे विमानतळ देतो
केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ;सांगलीत जल्लोषात उमेदवारी अर्ज दाखल
सांगली, दि.२४: सांगलीत आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या विजयाची हॅट्रिक करा; मी सांगलीला विमानतळ देतो ,अशी ग्वाही केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज दिली. भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार म्हणून सुधीरदादा गाडगीळ यांनी आज मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणात उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी नामदार मोहोळ बोलत होते.
दरम्यान आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या विजयाची हॅट्रिक करायची असा निर्धार आज येथे प्रचंड संख्येने उपस्थित कार्यकर्ते आणि नेत्यांनीही व्यक्त केला. सुधीरदादा गाडगीळ यांचा उमेदवारी अर्ज आज अत्यंत उत्साही वातावरणात दाखल करण्यात आला. त्यावेळी उपस्थित नेते व कार्यकर्ते बोलत होते.
सांगली विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्या वेळी निवडणूक लढवीत असलेले सुधीरदादा गाडगीळ यांचा उमेदवारी अर्ज आज मोठ्या जल्लोष आणि उत्साही वातावरणात दाखल झाल. त्यावेळी नामदार मोहोळ यांनी सुधीरदादा गाडगीळ यांच्या प्रचार कार्यालयाचेही उद्घाटन केले. नामदार मोहोळ म्हणाले सांगलीतील विमानतळाचा प्रश्न बरीच वर्षे प्रलंबित आहे. त्या विषयांमध्ये गांभीर्याने लक्ष घालून तो सोडवण्याचा निश्चितच प्रयत्न केला जाईल.
उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी पक्षाचे पश्चिम महाराष्ट्रातील समन्वयक शेखर इनामदार, माजी आमदार नितीनराजे शिंदे, माजी आमदार रमेशभाऊ शेंडगे, आमदार दिनकरतात्या पाटील , पक्षाचे नेते दीपकबाबा शिंदे,पक्षाच्या नेत्या नीता केळकर, भारतीय किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराजभैय्या पवार, युवा नेते गौतम पवार, पक्षाचे सरचिटणीस अविनाश मोहिते, श्रीकांततात्या शिंदे, माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष पद्माकर जगदाळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, केदार खाडीलकर, भाजप नेते मुन्नाभाई कुरणे, महिला आघाडीच्या अध्यक्षा गीतांजली ढोपे पाटील, माजी नगरसेविका उर्मिला बेलवलकर , युवा नेते अतुल माने आधी उपस्थित होते.उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नेते रवाना झाले त्यापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या संपर्क कार्यालयासमोर जाहीर सभा झाली. या सभेत अनेक नेत्यांची भाषणे झाली. सर्वांनी सुधीरदादा गाडगीळ यांच्या विजयाची हॅट्रिक करायची असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. अनेकांनी सुधीरदादा गाडगीळ यांनाच भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिल्याबद्दल पक्षाच्या प्रमुखांचे आभार मानले. सांगलीच्या विकासासाठी पुन्हा एकदा सुधीरदादा निवडून येणे अत्यावश्यक आहे असे यावेळी सांगण्यात आले.उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सुधीरदादा म्हणाले, सांगली विधानसभा मतदारसंघाचा विकास हाच माझा अजेंडा आहे. माझी लढत ही काँग्रेस पक्षाबरोबर असेल, परंतु विकासाचाच माझा प्रमुख अजेंडा आहे. पक्षामध्ये आता कोणतेही मतभेद नाहीत. सर्वजण एकजुटीने महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.दरम्यान आज सकाळी पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे समन्वयक शेखर इनामदार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन सुधीरदादा गाडगीळ यांनी भेट घेतली. त्यानंतर दोघांची गळा भेट झाली. उपस्थित कार्यकर्ते आणि नागरिकांसमोर दोघांनीही पक्षाच्या विजयासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचे करण्याची ग्वाही दिली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी सुधीरदादा गाडगीळ आणि शेखर इनामदार यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. त्यानंतर आमदार सुधीरदादा गाडगीळ, शेखर इनामदार, दीपकबाबा शिंदे, प्रकाश ढंग आदी नेतेमंडळी संपर्क कार्यालयाच्या ठिकाणी आली. त्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सर्वजण रवाना झाले.
सांगली : सांगली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी गुरुवारी त्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहल किनीचे यांच्याकडे सादर केला. त्यावेळी उपस्थित दिनकरतात्या पाटील, महेंद्र चंडाळे, शेखर इनामदार, प्रा. पद्माकर जगदाळे
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.