सांगलीतून 'वंचित बहुजन'ची अल्लाउद्दीन काझींना उमेदवारी
सांगली: सांगली विधानसभा मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीकडून माजी नगरसेवक अल्लाउद्दीन काझी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज राज्यातील दहा उमेदवारांची यादी जाहीर केली.
त्यात काझी यांचा समावेश आहे.
अल्लाउद्दीन काझी हे माजी नगरसेवक अजून त्यांना गेली लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. त्यांना नऊ हजाराहून अधिक मते मिळाली होती. आता त्यांना वंचितने सांगली मतदार संघातून उमेदवारी जाहीर केली आहे. त्याआधी जिल्ह्यातून खानापूर मतदार संघातून संग्राम माने यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
सांगली जिल्ह्यातील आठही मतदार संघातून वंचित बहुजन आघाडी उमेदवारी देणार आहे, असे आघाडीचे राज्य उपाध्यक्ष तथा सांगलीचे निरीक्षक सोमनाथ साळुंखे यांनी आज 'सकाळ'शी बोलताना सांगितले. वंचित बहुजन आघाडी सांगली, मिरज मतदार संघावर अधिक प्रभाव टाकू शकते. त्यामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढणार आहे.हा महाविकास आघाडीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे का, या प्रश्नावर श्री. साळुंखे म्हणाले, ''दबाव टाकावा एवढी काँग्रेसची ताकद राहिलेली नाही. आम्हाला राज्यभर लढायचे आहे, आम्ही लढणार आहोत. पुढील यादीत सांगली जिल्ह्यातील आणखी काही मतदार संघांतील उमेदवार जाहीर केले जातील.'
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.