Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली आणखी समृद्ध बनवायची आहे सुधीरदादा गाडगीळ; कर सल्लागार, कंपनी सेक्रेटरी यांच्याबरोबर चर्चा

सांगली आणखी समृद्ध बनवायची आहे सुधीरदादा गाडगीळ; कर सल्लागार, कंपनी सेक्रेटरी यांच्याबरोबर चर्चा
 

सांगली, दि.२९ : गेल्या दहा वर्षात सांगलीतील नागरी सुविधांचे बहुतांश प्रश्न सोडवण्यात मी यशस्वी झालो. आता आपल्याला सांगली अधिक समृद्ध करायची आहे. सांगलीत मोठे उद्योग आणायचे आहेत. त्या दृष्टीने मला समाजातील सर्व घटकांचे सहकार्य हवे आहे, असे आवाहन आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी आज येथे केले. सांगलीतील कर सल्लागार, चार्टर्ड अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी यांच्या बैठकीत आमदार गाडगीळ बोलत होते.

आमदार गाडगीळ म्हणाले, गेल्या दहा वर्षात सांगली शहरासह विधानसभा मतदारसंघात रस्ते, पूल, सांडपाण्याची व्यवस्था, पाणीपुरवठ्याची व्यवस्था त्याचबरोबर काही वैयक्तिक समस्यांचे निराकरण अशी कामे करण्यात मी यशस्वी ठरलो. यापुढे आपल्याला सांगली अधिक समृद्ध आणि  नव्या युगाचे प्रगतीचे प्रतिबिंब दिसेल अशी बनवायची आहे. त्या दृष्टीने आपल्याला येथे मोठे उद्योग आणायचे आहेत. येथील व्यापार आणखी समृद्ध करायचा आहे. गेल्या दहा वर्षात जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न केला आहे. त्यातही काही विषय प्रलंबित राहिले असतील तेही आपल्याला पुढच्या पाच वर्षात मार्गी लावायचे आहेत. यासाठी समाजातील सर्व घटकांचे सहकार्य आवश्यक आहे. यावेळी काहींनी करविषयक काही प्रश्न उपस्थित केले. 

विशेषत: जीएसटी संदर्भात त्यांच्या काही शंका होत्या. त्या संदर्भात आमदार गाडगीळ म्हणाले, निवडणूक झाल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या उपस्थितीत आपण सर्व संबंधितांची एक बैठक घेऊ. त्यामध्ये हे विषय निश्चितपणे मांडून त्यांचा पाठपुरावा केला जाईल. भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार म्हणाले, सुधीरदादा गाडगीळ यांनी गेल्या दहा वर्षात सांगली शहरात तसेच मतदारसंघात फार मोठी प्रगती घडवून आणली आहे. रस्ते, उड्डाणपूल यासह अनेक मोठी कामे त्यांनी केली आहेत. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अनेक सुविधा त्यांच्यामुळेच आल्या आहेत. तसेच सिविल हॉस्पिटलचा विस्तारही होत आहे.सांगलीत अद्यावत आणि सुसज्ज असे नाट्यगृह त्यांच्यामुळेच होत आहे. यापुढे त्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम सुसज्ज करायचे आहे. तसेच बॅडमिंटन कोर्ट आणि खेळाडूंसाठी जास्तीत जास्त अत्याधुनिक सुविधा निर्माण करायच्या आहेत. त्यासाठी त्यांनाच सांगलीतून पुन्हा मोठ्या मताधिक्याने विजयी करणे अत्यावश्यक आहे.
 
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या यांच्याबरोबर सांगलीतील मान्यवरांचा संवाद घडवून आणण्याचे नियोजन असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी, विश्वजीत पाटील, अतुल माने, प्रवीण जाधव, चेतन माडगूळकर, विजय साळुंखे , शरद देशमुख यांनी या बैठकीचे संयोजन करण्यात पुढाकार घेतला होता.

फोटो कॅप्शन
 
सांगली : कर सल्लागार, चार्टर्ड अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी यांच्या बैठकीत बोलताना आमदार सुधीरदादा गाडगीळ.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.