पेन्शन घेणाऱ्या व्यक्तींना प्रत्येक वर्षाला जीवन प्रमाण पत्र म्हणजेच लाईफ सर्टिफिकेट जमा करावे लागते. समजा लाइफ सर्टिफिकेट जमा करण्यास उशीर झाला किंवा सर्टिफिकेटमध्ये काही गोंधळ असला तर तुमची पेन्शन जागेवर थांबू शकते.
प्रत्येक व्यक्तीला रिटायरमेंट झाल्यानंतर पेन्शन सुरू होते. म्हणजेच सर्व व्यक्ती 60 वर्षांच्या पुढेच असतात. ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर हे दोन महिने पेन्शनकर्त्यांना सर्टिफिकेट जमा करण्यासाठीचे महत्वाचे महिने असतात. यामध्ये 80 वर्षांपुढील सीनियर सिटीझनसाठी 1 ऑक्टोबरपासून लाइफ सर्टिफिकेट जमा करण्यास सुरुवात झाली आहे. जमा केलेले हे प्रमाणपत्र पुढील वर्षाच्या 30 नोव्हेंबर या तारखेपर्यंतच व्हॅलिड असते.
अशा पद्धतीने पेन्शन लाईफ सर्टिफिकेट जमा करा :
लाईफ सर्टिफिकेट जमा करण्यासाठी तुम्हाला घरातून बाहेर पडण्याची गरज नाही किंवा बँकेमध्ये जाण्याची देखील गरज नाही तुम्ही थेट ऑनलाईन पद्धतीने तुमचे लाईफ सर्टिफिकेट जमा करू शकता.
1. सर्वप्रथम तुम्हाला पेन्शनर्सच्या पोर्टलवर जाऊन जीवन प्रमाणपत्र ॲप डाऊनलोड करून घ्यायचा आहे. त्यानंतर पेन्शनरला UIDAI द्वारे टूलच्या मदतीने फिंगर प्रिंट जमा करावे लागतील.
2. फिंगर प्रिंट रीडर स्मार्टफोनला कनेक्ट करण्यासाठी तुम्ही ओटीजी केबलचा देखील वापर करू शकता.
कोणाला मिळणार लाभ :
पेन्शन घेणाऱ्या व्यक्तींसाठी जीवन प्रमाणपत्र हे एक बायोमेट्रिक डिजिटल सर्व्हिसप्रमाणे आहे. यामध्ये राज्य सरकार, केंद्र सरकार आणि इतर संघटित क्षेत्रातील पेन्शन लाभार्थी फायदा घेऊ शकतात.
संपूर्ण प्रोसेस जाणून घ्या :
1. सर्वप्रथम तुम्ही तुमच्या डिवाइसमध्ये प्लेस्टोअरवरून जीवन प्रमाणपत्र हा ॲप डाऊनलोड करा. त्यानंतर तुमचा आधार नंबर, पीपीओ नंबर, बँकेचे नाव, बँकेचे खाते, त्याचबरोबर मोबाईल नंबर अशी सर्व माहिती द्यावी लागेल.
2. संपूर्ण महत्त्वाची माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला एक महत्त्वाचा ओटीपी पाठवण्यात येईल. त्यानंतर नवीन स्क्रीन ओपन झाल्यावर तुम्हाला ओटीपी टाकायचा आहे त्याचबरोबर नाव आणि ईमेल आयडी देखील फिलअप करून घ्यायचं आहे. पुढे तुम्हाला फिंगरप्रिंट स्कॅनर या ऑप्शनवर क्लिक करून फिंगर प्रिंट स्कॅन करून घ्यायचे आहेत.
3. पुढे तुमचा फिंगर प्रिंट ऑथेंटिक झाल्यानंतर स्क्रीनवर डिवाइस रजिस्ट्रेशन नावाचा मेसेज दिसेल. स्क्रीनमध्ये दाखवल्याप्रमाणे ओके या बटणावर क्लिक करायचं आहे. ऑथेंटिकेशन सर्टिफिकेट जनरेट झाल्यानंतर तुम्हाला नाव आणि आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे. पुढे तुम्हाला मिळालेला ओटीपी फिलअप करून ओके बटणावर क्लिक करायचं आहे.
4. त्यानंतर स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे पीपीओ नंबर, पेन्शन लाभार्थ्याचे संपूर्ण नाव, सेक्शनिंग ऑथॉरिटी, डिसवर्जिंग एजन्सी, बँक अकाउंट नंबर, ई-मेल आयडी यांसारखी दिली गेलेली माहिती भरून घ्या. त्यानंतर Remarried options, Re-Employed Options सिलेक्ट करून घ्या.
आता फिंगरप्रिंट बटनावर क्लिक करून तुमचे आईज स्कॅनिंग होणे सुरू होईल. आता तुम्हाला तुमचे पेन्शन सर्टिफिकेट देखील दिसेल त्याचबरोबर तुमच्या मोबाईल नंबरवर एक एसेमेस देखील पाठवण्यात येईल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.