Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

डिसेंबरपासून बँका आठवड्यातील पाच दिवसच राहणार सुरू? वेळेतही होणार बदल

डिसेंबरपासून बँका आठवड्यातील पाच दिवसच राहणार सुरू? वेळेतही होणार बदल


बँकिंग क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या काही काळापासून बँक कर्मचारी आठवड्यातील 5 दिवस कामाची मागणी करत होते. आतापर्यंत सरकारने कर्मचाऱ्यांची ही मागणी मान्य केलेली नाही.

परंतु या वर्षाच्या अखेरीस सरकार ही मागणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. नुकताच यासंदर्भात इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) आणि कर्मचारी संघटना यांच्यात एक करार झाला आहे. आता याला केवळ शासनाच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे आणि ती डिसेंबर 2024 पर्यंत मिळणे अपेक्षित आहे. 

आयबीए आणि कर्मचारी संघटनांच्या या प्रस्तावाला सरकारकडून मंजुरी मिळाल्यास आठवड्यातून फक्त पाच दिवस बँका सुरू होतील. सरकारने मान्यता दिल्यानंतर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्यांतर्गत शनिवार हा सुट्टीचा दिवस म्हणून ओळखला जाईल. म्हणजेच प्रत्येक आठवड्यात शनिवार आणि रविवारी बँका बंद राहतील. सध्या बँका प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी आणि प्रत्येक रविवारी बंद असतात. याशिवाय सणानिमित्त अनेक शहरातील बँकांना सुट्टी असते. 

सरकारी, खाजगी दोन्ही बँकांना लागू

आयबीए आणि बँक युनियन यांच्यात यापूर्वीच सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला आहे. डिसेंबर 2023 मध्ये झालेल्या या करारात सरकारी आणि खाजगी दोन्ही बँकांचा सहभाग होता. यानंतर 8 मार्च 2024 रोजी IBA आणि ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन यांच्यात एका संयुक्त करारावर देखील स्वाक्षरी करण्यात आली. यात 5 दिवस कामकाजाची आणि आठवड्याच्या शेवटी सुट्टीची रूपरेषा ठरविण्यात आली. मात्र हा बदल सरकारच्या मान्यतेवर अवलंबून असणार आहे. सरकार ते मान्य करेल अशी कर्मचाऱ्यांना अपेक्षा आहे. 

प्रस्ताव चर्चेसाठी आयबीआयकडे पाठवणार?

आयबीए आणि बँक युनियन यांच्यात झालेला हा प्रस्ताव भारतीय रिझर्व्ह बँकेकडे (RBI) चर्चेसाठी पाठवला जाईल. कारण बँकिंग तास आणि बँकांच्या अंतर्गत कामकाजावर नियंत्रण ठेवण्याचे काम आयबीआय करत असते. दरम्यान या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी सरकारने कोणतीही कालमर्यादा निश्चित केलेली नाही. परंतु या वर्षाच्या अखेरीस सरकार त्यासंदर्भात अधिसूचना काढू शकते अशी अपेक्षा आहे.

कमाचे तास वाढणार, वेळेतही होणार बदल


मीडिया रिपोर्ट्सनुसार सरकारने 5 दिवसांच्या कामकाजाला मान्यता दिली तर बँकांच्या दैनंदिन कामकाजाचे तास 40 मिनिटांनी वाढवले जाऊ शकतात. असे झाल्यास बँकेच्या कामकाजाच्या वेळेत देखील बदल केला जाऊ शकते. यामुळे बँकेच्या शाखा सकाळी 9.45 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत सुरू राहतील. सध्या बँका फक्त दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद असतात.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.