महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये मिळालेल्या दणदणीत विजयानंतर राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीचा आत्मविश्वास कमालीचा वाढलेला आहे. दरम्यान, आता अवघ्या काही दिवसांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून नियोजनबद्ध तयारी सुरू आहे.
तसेच तीन प्रमुख पक्ष एकत्र आल्याने निर्माण होऊ शकणारा जागावाटपाटा तिढा सोडवण्यासाठीही महाविकास आघाडीकडून एकेक पाऊल सावधपणे टाकलं जात आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठीचा महाविकास आघाडीतील जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास फायनल झाल्याचं वृत्त आहे. तसेच या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार विधानसभेसाठी काँग्रेसला सर्वाधिक जागा देण्यात येणार आहे. त्याखालोखाल शिवसेना उबाठा पक्षाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला जागा दिल्या जाणार आहेत.
दरम्यान, महाविकास आघाडीमधील जागावाटपाबाब जो फॉर्म्युला समोर येत आहे त्यानुसार लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला विधानसभेच्या जागावाटपात सर्वाधिक जागा दिल्या जातील. काँग्रेसला १०० ते १०५ जागा मिळतील, असे सांगण्यात येत आहे. त्याखालोखाल शिवसेना उबाठा पक्षाला ९५ ते १०० जागा दिल्या जातील. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला ८० ते ८५ जागा दिल्या जातील, अशी माहिती समोर येत आहे.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. त्यामध्ये काँग्रेसने १३+१ (अपक्ष), शिवसेना उबाठा पक्षाने ९ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ८ जागांवर विजय मिळवला होता. लोकसभा निवडणुकीतील विधानसभा मतदारसंघ निहाय आघाडी पाहिल्यास काँग्रेसला ६३, शिवसेना उबाठा पक्षाला ५६ आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला ३२ जागांवर आघाडी मिळाली होती.दुसरीकडे राज्यातील महायुतीमधील घटकपक्षांचाही जागावाटपाचा फॉर्म्युलाही फायनल झाल्याचे सांगण्यात येत आहे. या फॉर्म्युल्यानुसार भाजपा १५५ ते १६०, शिवसेना शिंदे गट ७३ ते ७५ आणि अजित पवार गटाला ६० ते ६२ जागा मिळण्याची शक्यता आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.