भारताला हिंदू राष्ट्र बनू देणार नाही : तौकीर रझा
नवी दिल्ली: पैगंबरांच्या सन्मानाचा अपमान खपवून घेतला जाणार नाही, आम्ही आंदोलन करणार नाही, आता देश ठप्प करू,भारताला हिंदू राष्ट्र बनू देणार नाही असे इत्तेहाद-ए-मिल्लत कौन्सिलचे (IMC) अध्यक्ष मौलाना तौकीर रझा खान यांनी बरेली येथे आयएमसीच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान इशारा दिला आहे.
आयएमसीच्या स्थापना दिनानिमित्त ते मंचावरून म्हणाले की, पैगंबरांचा अपमान कधीपर्यंत होत राहणार. आता आंदोलने होणार नाहीत, निवेदने दिली जाणार नाहीत, उलट देशाची नाकेबंदी केली जाईल. त्यासाठीची नवी तारीख दसऱ्यानंतर जाहीर केली जाईल. मग भारतातील तमाम मुस्लिम दिल्ली गाठतील आणि देश ठप्प करतील.व माझा मुद्दा ठेवेल. देशातील प्रत्येक जिल्ह्यातून मुस्लिम तिरंगा घेऊन बाहेर पडतील, तेव्हा शहर नक्कीच ठप्प होईल. एक दिवसाचे दु:ख सहन करून देशाच्या भल्यासाठी हे करता येईल. पुढे ते म्हणाले , imc president Tauqeer Raza कोणी खरा हिंदू, प्रामाणिक हिंदू असेल, तर तो आपल्या समाजासाठी समस्या निर्माण करणार नाही. समस्या निर्माण करणाऱ्यांना मी सांगेन की, जर आपणही तेच करायला लागलो तर देशाची काय अवस्था होईल?
केंद्र सरकारवर निशाणा साधत ते imc president Tauqeer Raza म्हणाले की, आम्ही कोणत्याही किंमतीवर देशाला हिंदू राष्ट्र होऊ देणार नाही. त्याचवेळी गाझियाबाद मंदिराचे महंत यती नरसिंहानंद यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर ते म्हणाले की, संत आणि ऋषींचे काम प्रेम आणि आपुलकीचे वाटप करणे आहे.द्वेष वाटण्यासाठी नाही.दरम्यान, बरेलीमध्ये मौलाना तौकीर रझा यांच्या कार्यक्रमादरम्यान एका स्थानिक ज्येष्ठ पत्रकारालाही मारहाण करण्यात आली होती.खरे तर तौकीर रझा जेव्हा लोकांना संबोधित करत होते तेव्हा, एका मुस्लिम तरुणाने पत्रकारांशी आधी अपशब्द वापरले व नंतर एका ज्येष्ठ पत्रकाराशी बाचाबाची केली. .त्यामुळे, इतर पत्रकारांनी तौकीर रझा यांच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. मात्र, नंतर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांनी पीडित पत्रकाराची माफी मागितली आणि प्रकरण संपविले .
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.