Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत आमदार भाजपचाच होईलसुधीरदादा गाडगीळ; मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सन्मान मेळावा

सांगलीत आमदार भाजपचाच होईल सुधीरदादा गाडगीळ; मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सन्मान मेळावा
 

सांगली, बुधवार दि. ९ ऑक्टोंबर  २०२४ : सांगली विधानसभा मतदारसंघात पुन्हा भारतीय जनता पक्षाचाच आमदार होईल, अशी ग्वाही आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी दिली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिला सन्मान मेळाव्यात ते बोलत होते. गणेशनगरमधील रोटरी हॉलमध्ये आयोजित या मेळाव्यास महिलांची प्रचंड गर्दी झाली होती. सुधीरदादा गाडगीळ यांचे व्यासपीठावर आगमन होताच सुधीरदादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, सांगलीचे आमदार ; सुधीरदादाच पुन्हा होणार,अशा जोरदार घोषणा उपस्थित महिलांनी दिल्या. सौ. मंजिरीताई सुधीरदादा गाडगीळ उपस्थित होत्या. भारतीय जनता पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार उपस्थित होते.

आमदार गाडगीळ म्हणाले, प्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येताच २०१४ पासून देशात महिलांच्या सबलीकरणाचे काम सुरू केले आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाने राज्यातील महायुती सरकारने  महिलांच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी लाडकी बहीणसह अनेक योजना राबवल्या आहेत. त्यामुळे महिलांनी भारतीय जनता पक्ष महायुतीच्या पाठीमागे त्यांची शक्ती उभी करावी.

शेखर इनामदार म्हणाले, भारतीय जनता पक्षात व्यक्तिगत मत नसते. पक्षाच्या आदेशानुसार काम करावे लागते. त्यामुळे सुधीरदादा यांनी कोणतीही इच्छा व्यक्त केली असली तरी त्यांना पक्षाने आदेश दिला की सांगलीतून पुन्हा निवडणूक लढवावीच लागेल. त्यांच्या एवढा लोकप्रिय आणि लोकांसाठी काम करणारा दुसरा नेता येथे नाही. सौ. मंजिरीताई गाडगीळ म्हणाल्या, महाविकास आघाडीचे काही नेते लाडकी बहीणसह महिलांसाठीच्या विविध योजनांवर टीका करीत आहेत. यावरून त्यांचा या योजनांना विरोध असल्याचे स्पष्ट दिसते. त्यामुळे महिलांच्या प्रगतीत अडथळा आणणाऱ्या अशा लोकांना बिलकुल थारा देऊ नका. भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचा प्रचार महिलांनीच पुढाकार घेऊन करावा.
 
गणेशनगरमधील रोटरी हॉलमध्ये महिलांची एवढी प्रचंड गर्दी झाली की खुर्च्या कमी पडल्या. सुधीरदादांचे स्वागत फटाक्यांच्या आतिश बाजीत आणि घोषणांच्या निनादात पंचारतीने ओवाळून करण्यात आले. आदी बूथ प्रमुख  उपस्थित यावेळी पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर  इनामदार, ज्येष्ठ नेते मुन्ना  कुरणे, महिला सरचिटणीस स्वातीताई शिंदे  माजी नगरसेविका सुनंदा राउत,  उर्मिला बेलवलकर, भारती दिगडे, महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील, सुजित राऊत, मध्य मंडल अध्यक्ष आनंदा चिकोडे,  गजानन नलवडे, अभिजित बिराजदार, रोहित जगदाळे, अजय लोखंडे,  छाया हाक्के, उदय बेलवलकर, माधुरी वसगडेकर,  अजिंक्यन फाउंडेशन च्या स्मिता घेवारे, स्वाती भिडे, विद्या खिलारे, अविनाश मोहिते,  अमर पडळकर, रणजित सावंत तसेच आदी बूथ प्रमुख  उपस्थित होते.
 

 

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.