'महामूर्ख जमात म्हणजे हिंदू जात, गांडू', संभाजी भिडेंची वादग्रस्त वक्तव्य
“गणपती उत्सव, नवरात्र उत्सव हे आता इव्हेंट झाले आहेत. हिंदू समाजाला गांडू बनवत आहेत. राजकारण, सत्ताकारण, अर्थकारण शूद्र आहे. हे थुंकण्याच्या लायकीचे विषय. जगाच्या पाठीवर असंख्य देशांनी आक्रमण केलेला बेशर्म लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्थान आहे” असं धक्कादायक वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं आहे.
“शिवाजी महाराजांनी हिंदू समाजाला जगाचा बाप व्हायचा मार्ग शिकवलाय. पण गणपती उत्सवाचा चोथा झाला आहे. नवरात्र उत्सवात दांडिया हिंदू समाजाला गांडू बनवत चालला आहे. हे सर्व नाही चालणार नवरात्राचा बट्ट्याबोळ आम्ही होऊ देणार नाही” असं संभाजी भिडे म्हणाले.“काही माता-भगिनी यांनी यापुढे स्वतंत्र दुर्गामाता दौड काढावी. आम्ही नवरात्राचा बट्ट्याबोळ हाणून पाडू. नवरात्र उत्सवात कार्यक्रम करमणूक हे सर्व सध्या सुरू आहे. हे सर्व नाश करत चालले आहेत” असे वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं. ते सांगलीमध्ये दुर्गा माता दौडी दरम्यान बोलत होते.
‘बेशर्म लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्थान’
“जगाच्या पाठीवर असंख्य देशांनी आक्रमण केलेला बेशर्म लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्थान आहे. आतापर्यंत 76 राष्ट्रांनी आपल्यावर आक्रमणं केली. ते आता पाटलाग करतायत, आपण पाय लाऊन पळत आहोत. हिंदी-चिनी भाई-भाई म्हणणारा पंतप्रधान आपल्याला दुर्दैवाने मिळाला. हिंदू-मुस्लिम भाई-भाई, हिंदुंना शत्रू कोण, वैरी, वाईट कोण, चांगलं कोण हे कळत नाही. महामूर्ख जमात म्हणजे हिंदू जात” असं वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं.
‘हे थुंकण्याच्या लायकीचे विषय’
“राजकारण, सत्ताकारण, अर्थकारण शूद्र आहे. हे थुंकण्याच्या लायकीचे विषय आहेत. शिवाजी महाराजांच्या विचारांचा भारत करण्यासाठी आपल्याला प्रयत्न केले पाहिजेत” असं संभाजी भिडे म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.