Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नवरात्री निमित्त सांगलीत होणार साडेतीन शक्तीपीठ प्रतिकृती दर्शनपृथ्वीराज पाटील फाउंडेशनचा उपक्रम : आजपासून सांस्कृतिक कार्यक्रम

नवरात्री निमित्त सांगलीत होणार साडेतीन शक्तीपीठ प्रतिकृती दर्शन पृथ्वीराज पाटील फाउंडेशनचा उपक्रम  : आजपासून सांस्कृतिक कार्यक्रम
 

सांगली : आज पासून सुरू होत असलेल्या नवरात्रीनिमित्ताने महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांच्या प्रतिकृतीच्या दर्शनाचा कार्यक्रम पृथ्वीराज पाटील फाउंडेशन तर्फे आयोजित करण्यात आला आहे. पुढील नऊ दिवस या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. फाउंडेशनचे अध्यक्ष बिपिन कदम यांनी ही माहिती दिली.

 
येथील सांगली-मिरज रस्त्यावरील टाटा पेट्रोल पंपाच्या पाठीमागे, उद्योग भवन शेजारील मैदानावर शक्तिपीठांच्या भव्य प्रतिकृती उभारण्यात आले आहेत. करदर्शनम सांगलीचा नवरात्रोत्सव, हा सांस्कृतिक मेळा नऊ दिवस चालणार आहे. रोज सायंकाळी सहा पासून कार्यक्रम सुरू होतील. उद्या (ता. 3) परेश पेठे यांचा स्वर सरांचे कार्यक्रम होईल.

शनिवारी महाराष्ट्राची शक्तिपीठे हा सांस्कृतिक हा सांस्कृतिक दर्शन घडवणारा कलाविष्कार सादर केला जाईल. रविवारी विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतील. सोमवारी यशस्वी उद्योजिका जयंती कठाळे यांची मुलाखत होईल. मंगळवारी गणेश शिंदे आणि सन्मित्र शिंदे यांचा मोगरा फुलला हा भक्तिमय कार्यक्रम होईल. बुधवारी इंद्रनील बंकापूर यांचे व्याख्यान आहे. गुरुवारी विविध कार्यक्रम होतील तर शुक्रवारी सारेगमप फेम मुग्ध वैशंपायम आणि प्रथमेश लगाटे यांच्या गायनाचा कार्यक्रम होईल. शनिवारी 12 ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रमाने या सोहळ्याची सांगता होईल.  बिपिन कदम म्हणाले, " एक भव्य नवरात्र उत्सव या निमित्ताने सांगलीकरांना अनुभवता येणार आहे. या कार्यक्रमासाठी पार्किंग व बैठक व्यवस्था स्वतंत्रपणे करण्यात आलेली आहे."

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.